gram market Rate : हरभऱ्याला कसा मिळतोय बाजारभाव? जाणून घ्या..

gram market Rate

gram market Rate: लवकरच हरभरा काढणी सुरू होऊन बाजारात पीक येणार आहे. त्यामुळे अनेकांना बाजारभावाबद्दलची उत्सुकता आहे. आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी हरभऱ्याला जळगाव जिल्ह्यातील म्हसावद बाजारात सरासरी ५३९५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

दरम्यान काल सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी हिंगणघाट बाजारात हरभऱ्याची ११ हजार ४७९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५ हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त बाजारभाव ५ हजार ७१५ रुपये प्रति क्विंटल मिळाले. तर सरासरी ५ हजार ५०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळालेत.

मुर्तीजापूर बाजारात २८०० क्विंटल हरभरा आवक होऊन कमीत कमी ५४७० रुपये आणि जास्तीत जास्त ५ हजार ९९५ रुपये बाजारभाव मिळाले. सरासरी ५ हजार ७२५ रुपये बाजारभाव मिळाले. वणी बाजारात सरासरी ५५०० रुपये, वर्धा बाजारात ५६०५ रुपये बाजारभाव सरासरी प्रति क्विंटलसाठी मिळाले.

नागपूर बाजारात २४६२ क्विंटल हरभरा आवक होऊन कमीत कमी ५ हजार ४४० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला, तर जास्तीत जास्त ५ हजार ७५०रुपये तर सरासरी ५ हजार ६६३ रुपये बाजारभाव मिळाले. मंगळूरपीर शेलूबाजारात काट्या हरभऱ्याची १५२४ क्विंटल आवक होऊन सरासरी ५ हजार ५०० रुपये बाजारभाव मिळाला.

अकोला बाजारात काबुली हरभऱ्याला सरासरी ८ हजार १०० रुपये बाजारभाव मिळाले. मलकापूर बाजारात चाफा हरभऱ्याला सरासरी ५ हजार ५०० रुपये, तर वाशीम बाजारातही चाफा हरभऱ्याला सरासरी ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

दरम्यान कारंजा बाजारात ३८०० क्विंटल हरभरा आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५ हजार रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव ५ हजार ५८५ तर सरासरी ५ हजार ५८५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. हिंगोली बाजारात सरासरी ५ हजार ५४२ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

Leave a Reply