Weather Update : थंडीत वाढ होण्याची शक्यता कशी ?

Weather Update : मावळलेल्या पावसाळी वातावरणामुळे महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील. त्यामुळे पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि.१२ फेब्रुवारी (माघ पौर्णिमे) पर्यंत पहाटेचे किमान तापमानात १ ते २ डिग्री से.ग्रेड पर्यंत आता घसरण होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रात, येणाऱ्या ह्या १० दिवसात, चढ- उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. 

किमान तापमानात २ डिग्रीची घसरण होणार असली तरी हे किमान तापमान सरासरीपेक्षा २ डिग्रीने अधिकच असेल. कारण पूर्वी ढगाळ वातावरणामुळे ३ ते ५ डिग्री से. ग्रेड ने होणाऱ्या वाढी ऐवजी २ डिग्रीच्या घसरणीमुळे एकूणच किमान तापमानात आता केवळ सरासरीपेक्षा अंदाजे २ डिग्री से. ग्रेड नेच अधिक राहण्याची शक्यता जाणवते.  

किमान तापमानातील ही २ किंवा अधिक डिग्रीची घसरण, विशेषतः मध्य महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर ह्या ८ जिल्ह्यात अधिकच जाणवेल, असे वाटते.

आता पर्यंतच्या थंडीच्या लाटेतून महाराष्ट्राला सहसा फेब्रुवारी महिन्यात सरासरी ५ ते ७ दिवसाच्या थंडीच्या लाटेचा कालावधी मिळत असतो. ह्या वर्षीच्या ‘ला- निना’ च्या २०२५ च्या फेब्रुवारी महिन्यात ही साधारण तेव्हढ्याच ५ ते ७ दिवसाच्या कालावधीच्या थंडीच्या लाटेची अपेक्षा करता येईल असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *