kanda bajarbhav : रविवारच्या सुटीनंतर आज सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याचे लिलाव सुरू झाले, तेव्हा शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील ही अपेक्षा होती. पण लिलावानंतर उलट त्यांच्या पदरी निराशाच पडली. शनिवारी लासलगावला लाल कांद्याला सरासरी २७०० रुपये प्रति क्विंटल बाजार होता. आज सोमवारी दिनांक १६ डिसेंबर रोजी त्यात आणखी ५ रुपयांची घसरण होऊन प्रति क्विंटल २२०० रुपये इतका भाव मिळाला आहे.
दरम्यान लासलगावला आज किमान १ हजार, कमाल ३२००, तर सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. आज या बाजारात सुमारे साडेपंधरा हजार क्विंटल लाल कांदयाची सकाळच्या सत्रात आवक झाली.
काल रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी पुण्याच्या बाजारात लाल कांद्याला सरासरी ४ हजार रुपयांचा दर मिळाला होता. मात्र सोमवारी त्यात घट झाल्याचे दिसून आले. पुणे बाजारात लोकल कांद्याची सोमवारी साडेतेरा हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी १६०० रुपये, जास्तीत जास्त ६ हजार तर सरासरी ३६०० रुपये प्रति क्विंटलसाठी दर मिळाला.
कराड बाजारात हळव्या कांद्याला सरासरी ३२०० रुपये, पिंपरी बाजारात लोकल कांद्याला २७५० तर मोशी कांद्याला सरासरी २४०० रुपये बाजारभाव मिळाला.












