
गोरख एकनाथ बढे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केकतजळगाव (ता.पैठण) इथे पाच एकर शेती आहे. रेशमी उद्योग हे श्री.बढे चार वर्षापासून करत आहेत. ते पारंपारिक कपाशी व इतर पिकांचे उत्पादन त्याआधी घेत होते. आर्थिक दृष्ट्या त्यातून मात्र फासे काही पदरात पडत नव्हते. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या शाश्वत उत्पन्न मिळेल अशा स्त्रोताच्या शोधात होते. रेशीमशेतीबाबत त्यावेळी त्यांना माहिती मिळाली. रेशीमशेतीस सुरुवात म्हणून तुती लागवड व शेड उभारणी करतेवेळी यामध्ये त्यांना यश आले नाही तर शेळी पालन करू असा त्यांच्या मनात विचार होता.
रेशीमशेतीस सुरुवात केल्यानंतर चांगले उत्पन्न अल्प खर्चात मिळू लागले. गोरख यांच्या पति सौ नंदा या रेषीमशेती मध्ये यांची मोलाची भूमिका बजावतात.त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये अंडीपुंजासाठी लागणाऱ्या कोशाचे उत्पादन घेण्यात हातखंडा तयार केला आहे.बढे कुटुंबाला मागील चार वर्षात रेशमी उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता मिळाली आहे.
कशी केली रेशीम उद्योगाची सुरुवात
गोरख एकनाथ बढे यांनी रेशमी उद्योगाची सुरुवात करण्यासाठी २२ बाय ६० फूट आकाराचे शेड उभारले. त्यांनी तुतीची लागवड चार बाय दीड फूट अंतरावर दीड एकरांमध्ये केली. हळूहळू व्यवसायात चांगला जम बसू लागला ,रेशीममधून चांगले उत्पन्न हाती येऊ लागले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्यांनी पुढे काही महिन्यांमध्येच एक एकर क्षेत्रावरील मोसंबी बागेत आंतरपीक म्हणून तुतीची अर्धा एकरावर दुसरी लागवड केली. साधारण ४ ते ५ बॅच वर्षभरात घेतल्या जातात. सरासरी ३०० अंडीपुंजाची एक बॅच असते.
सिंचनाच्या सोयी ः
रेशीम उद्योगातुन मिळालेल्या पैशातून त्यांनी एक सामाईक व एक स्वतःची अशा दोन विहीर खोदून सिंचनाच्या पाण्याची सोय केली. यंदा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी झाला. त्यामुळे तुती बागेसाठी त्यांनी शेजारील एका शेतकऱ्याकडून त्याच्याकडील शेततळ्यातील पाणी देण्याची विनंती केली. तसेच आता त्यांनी पाण्याचा प्रमाणात वापर करण्यासाठी संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे.
कोष उत्पादन
रेशीम कोष उत्पादनाचा एकूण पाच बॅच दरवर्षी घेतल्या जातात. कोष उत्पादनास सुरुवात केल्यानंतर पहिल्या वर्षी १०० ते १५० अंडीपुंजाच्या (चॉकी) पाच बॅच, दुसऱ्या वर्षी १५० ते २०० चॉकीच्या पाच बॅच तर तिसऱ्या वर्षी ३०० चॉकीच्या पाच बॅच घेतल्या आहेत. चौथी बॅच यावर्षी पाऊस कमी झाल्याने नियोजनानुसार घेणे शक्य झाले नाही.पारंपारिक कोष उत्पादन करताना १०० अंडीपुंजांपासून ८० ते ८५ किलोपर्यंत कोश उत्पादन त्यांनी घेतले आहे. श्री.बढे यांनी सांगितले की अंडीपुंजासाठी लागणारे कोश मागील दोन वर्षात उत्पादन करताना ४० ते ७० किलोपर्यंत प्रति १०० अंडीपूजाला कोश उत्पादन घेणे शक्य झाले आहे. .
बॅच नियोजन
वीस मे च्या दरम्यान दरवर्षी साधारण तुती बागेची छाटणी केली जाते. त्यानंतर बागेला पाणी देऊन खत मात्रा दिली जाते. अंतर मशागतीची कामे त्यानंतर करून पुन्हा पाणी सोडले जाते. अंडीपुंजाची आगाऊ मागणी बॅचच्या नियोजनानुसार एक जुलै च्या दरम्यान साधारणत: नोंदवली जाते. अंडीपुंज शेडवर त्यानुसार साधारण 10 जुलै दरम्यान प्रत्यक्ष प्राप्त होऊन बॅच सुरू होते. चंद्रिका साधारण विसव्या दिवशी टाकल्या जातात. प्रत्येक बॅचमध्ये रेशीम कीटकांना दर्जेदार तुती पाला उपलब्ध करण्यावर एक प्रमाणात भर दिला जातो. सिंचन व्यवस्थापनावर, खत, आंतरमशागतीचे कामे हे लक्ष केंद्रित करून चंद्रिका टाकल्यानंतर बागेकडे लक्ष केंद्रित करून आंतरमशागतीची कामे, खत, सिंचन व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यानंतर एक बॅच पूर्ण झाल्यावर पुढील बॅचसाठी पाला उपलब्ध होईल याकडे लक्ष दिले जाते.
शेड निर्जंतुकीकरणावर भर
संपूर्ण शेड एक बॅच संपली की लगेच पूर्ण स्वच्छ करून घेतले जाते. प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी शेडचे निर्जतुकीकरण हे बॅच घेतल्यानंतर रेशीम कीटकांना कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केले जाते. निर्जतुकीकरणासाठी फवारणी केल्यानंतर साधारण ४८ तासांनी शेड उघडून त्यातील दमटपणा गेल्यानंतर पहिली बॅच सुरू केली जाते. ब्लिचिंग पावडर, चुना निर्जतुकीकरणाच्या फवारणीसाठी टाकला जातो. शेडचे छत, रॅकचे व या द्रावणाने शेडमधील नेट निर्जतुकीकरण केले जाते .
चॉकी व्यवस्थापन
निर्जंतुकीकरण पावडर शेड मध्ये मारून चॉकी शेडमध्ये आणल्यानंतर कीटकांना खाण्यासाठी पाला टाकला जातो. सकाळ व तिसरा मोल्ट पास होईपर्यंत सिंगल काडी संध्याकाळी सुरुवातीचे काही दिवस तुती पाला टाकला जातो. डबल काडी पाला तिसरा मोल्ट पास झाल्यानंतर वापरला जातो . श्री बढे सांगतात की अशा पद्धतीने प्रत्येक मोल्ट नंतर पाल्याचा वापर वाढविला जातो.
खत आणि पाणी व्यवस्थापन
-प्रत्येक बॅच सुरू करण्यापूर्वी बागेची छाटणी करून रासायनिक खतांचा मात्रा दिल्या जातात. अंतर्मन सागर तिची कामे करून त्यानंतर पहिले पाणी दंडाने मोकळे दिले जाते. आठ दिवसांनी तुतीच्या दीड एकर क्षेत्रात दोन टप्पे पाडून प्रत्येक टप्प्याला वापसा स्थितीनुसार आठ तास पाणी दिले जातात.
– रसायनिक खतांचा मात्रा आलटून पालटून प्रत्येक बॅच घेताना देण्याचे त्यांचे नियोजन असते. बोराण आणि सल्फरच्या प्रत्येकी एक बॅग त्यानुसार पहिल्या वेळी १०:२६:२६, दिल्या जातात. श्री बढे सांगतात की आलटून पालटून खत मात्र देण्याचे नियोजन केल्यामुळे दर्जेदार तुती पाला उपलब्ध होत असल्याचे सांगितले. चांगले कुजलेले शेणखत दोन वर्षातून एकदा उन्हाळ्यात चार ते पाच ट्रॉली शेणखत तुती लागवड दिले जाते.
आगामी नियोजन
– कोर्स काढण्याची सध्या शेडमध्ये कामे सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस ही बॅच घेण्यात आली होती. चौथी बॅच अंडीपुंजाची साधारण अंतिम टप्प्यात पोहचली आहे
– तुटी बागेमध्ये सध्या छाटणी केलेली असून बाग फुटण्याच्या स्थितीत आहे.
– आंतरमशागतीची कामे करून रासायनिक खत मात्रा आणि सिंचन बागेत केले आहे.
– तुती लागवडीस सिंचनासाठी यावर्षी कमी पाणी असल्याने साधारण 30 मार्चनंतर आणखी एक बॅच घेण्याचे त्यांचे नियोजन आहे