महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन नवीन योजना राबवत असते. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मध केंद्र योजना . महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेची अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समिती स्थापन केली आहे. सध्या शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून मध उत्पादन व्यवसायाकडे बघितले जाते . त्यामुळे मध केंद्र योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार ही निर्माण होईल.
योजनेचे लाभ काय असतील.
◼️ 50% साहित्य स्वरूपात अनुदान.
◼️ मोफत मध उद्योग शासकीय प्रशिक्षण.
या योजनेतील वर्गवारी
◼️ वैयक्तिक मधपाळ
◼️ केंद्र चालक प्रगतशील मधपाळ
◼️ केंद्र चालक संस्था
◼️ विशेष छंद प्रशिक्षण
◼️ आग्या मध संकलन प्रशिक्षण
वैयक्तिक मधपाळ –
◼️ दहावी पास असणे गरजेचे आहे.
◼️ 24 हजार रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक .
◼️ 24 हजार रुपयांची साहित्य आणि साधने मिळणार आहे.
◼️ या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक.
केंद्र चालक प्रगतशील मधपाळ
◼️ 21 वर्षे पूर्ण
◼️ दहावी पास असणे गरजेचे.
◼️ किमान एक एकर जमीन आवश्यक.
◼️ जमीन स्वतःची नसल्यास भाडेतत्त्वावर घेणे.
◼️ मधमाशा पालन प्रशिक्षण मधमाशा, प्रजनन सुविधा असणे आवश्यक.
केंद्र चालक संस्था
◼️ ही संस्था कायद्याने नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
◼️ मधमाशा पालन प्रशिक्षण, मधमाशा प्रजनन सुविधा असणे गरजेचे आहे.
◼️ संस्थेकडे स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली हजार स्क्वेअर फुट इमारत व एक एकर जमीन पाहिजे.
विशेष छंद प्रशिक्षण
◼️ २५ रुपये फी आकारण्यात येईल.
◼️ पाच दिवस शासकीय प्रशिक्षण देण्यात येईल.
◼️ संकलन प्रशिक्षण 18 ते 50 वयोगटातील आणि आणि साक्षर व्यक्ती यासाठी पात्र.
◼️ पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ महाबळेश्वर जिल्हा सातारा . प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय.