
Crop cultivation : खरीप हंगामात राज्यातील अनेक शेतकरी नाचणी, वरई आणि खुरसणीसारखी पिके घेतात. यासाठी योग्य तयारी गरजेची आहे. नाचणीसाठी फुले नाचणी, दापोली-१, दापोली-२ व फुले कासारी ही वाण निवडावीत. वाफा १ ते १.५ मीटर रुंद, ८ ते १० सें.मी उंच आणि उतारानुसार लांब असावा. पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर, पुरेसा पाऊस झाल्यावर करावी.
वरईसाठी फुले एकाशी हा वाण अत्यंत उपयुक्त आहे. वरईसाठीही वाफा तयार करून ८ दिवसांच्या अंतराने दोन टप्प्यांमध्ये पेरणी करावी. खुरसणीसाठी फुले वैतरणा आणि फुले कारळा वाण उपयुक्त ठरतात. पेरणीपूर्वी बियाण्यात वाळू मिसळून पेरणी करावी. बी टाकल्यानंतर पाभर्याने मिट्टी झाकावी. ओळीतील अंतर ३० सें.मी. असावे.
ही सर्व पिके कोरडवाहू भागात अल्प खर्चात घेतली जातात. पण योग्य रोपवाटिका आणि जमिनीची मशागत झाली नाही तर उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे पीक घेताना माती परीक्षण करून खत व्यवस्थापन करावे. बियाण्यांची प्रमाणित स्रोतावरूनच खरेदी करावी.