![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/मराठवाड्यातील-काही-ठिकाणी-पावसाचा-अंदाज-पुढील-चार-दिवस-राज्यातील-वातावरण-कसे-राहील.webp)
राज्यामध्ये काल काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज होता . मिचाॅन्ग चक्रीवादळ जमिनीवर येऊन त्याचे अतितीव्र दाब क्षेत्रात रुपांतर झाले आहे. मिचाॅन्ग काल आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बापतला भागात अतितीव्र चक्रीवादळ धडकले. यातील अतितीव्र चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र दाब क्षेत्रात झाले होते. हे तीव्र दाब क्षेत्र आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारी भागात होते.
तर तेलंगणाच्या आग्नेय भागात आणि लगतच्या दक्षिण छत्तीसगड तसेच आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा ,ओडिशा छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तसेच केरळ आणि तमिळनाडूतही काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत आहेत.
राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते तर लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. तसेच ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहील असे सांगितले होते ,तर पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पावसाळी वातावरण निवळल्याने शेतकरी आता शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला आहे . तर प्रशासनाला पंचनाम्याचे काम पूर्ण करण्यास मदत होणार आहे.