
kanda bajarbhav : आज मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी पुणे बाजारात कांद्याला सरासरी २ हजार आणि कमीत कमी १३०० रुपये बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आज येथील बाजारभाव टिकून आहेत. सोमवारी लासलगाव बाजारसमितीत २५०० रुपये प्रति क्विंटल असे वधारलेले दिसून आले. पिंपळगाव बसवंत बाजारात २३५० इतके होते. सोलापूर बाजारात २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते.
दोन आठवड्यापूर्वी राज्यात कांद्याची दररोज सुमारे साडेतीन लाख क्विंटल आवक होत होती. मागच्या आठवड्यात संक्रांत आणि त्यानंतर आलेल्य सुटीनंतर बाजारातील ही आवक मंदावली होती. त्यामुळे मागच्या आठवड्यात सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कांद्याचे टिकून राहिले. या आठवड्यात सोमवारी बाजार सुरू होताच कांद्याचे बाजारभाव हे पुन्हा एक ते दोन रुपयांनी वधारलेले दिसून आले.
रविवारी १९ जानेवारी रोजी राज्यात सुमारे ८९ लाख क्विंटल कांदा आवक झाली. तर सोमवारी २० जानेवारी रोजी २ लाख ८० हजार क्विंटल कांदा आवक झाली. मागच्या सोमवारी ही आवक अडीच लाख क्विंटल होती. तर त्यानंतर दोन दिवस सुमारे १ लाख क्विंटल दररोज सरासरी आणि शुक्रवार आणि शनिवारी सरासरी अडीच लाख क्विंटल अशी राहिली. एकूण आवक कमी राहिल्याने भाव टिकून राहिले.
सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी लासलगाव बाजारात सुमारे २ लाख ८० हजार क्विंटल कांदा आवक राहिली. मात्र तरीही कांदा बाजारभाव टिकून राहिले. सोमवारी एकट्या नाशिक जिल्हयात लाल आणि पोळ कांद्याची आवक सुमारे पावणेदोन लाख क्विंटलपेक्षा जास्त होती. पोळ कांद्याला सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल, तर लाल कांद्याला सरासरी २२५६ रुपये बाजारभाव नाशिक जिल्ह्यात मिळाला.
पुणे जिल्ह्यात २११० तर सोलापूर जिल्हयात २ हजार रुपये बाजारभाव मिळाला, सोमवारी नगर जिल्ह्यात आवक कमी राहिली. सर्व मिळून सुमारे १५ हजार क्विंटल आवक झाली, या ठिकाणी सरासरी २१०० रुपये आणि एका बाजारात सरासरी १६०० रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान देशातून कांदा निर्यात सुरू असून मागणीही टिकून आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर स्थिर राहतील. मंगळवारपासून जर आवक स्थिर राहिली, तर कांदा बाजारभाव फारसे पडणार नाहीत. मात्र जर राज्यातील आवक दररोज सरासरी दोन ते अडीच लाखांच्या आसपास राहिली, तर कांदा बाजारभाव २ हजारावर राहतील, पण हीच आवक जर तीन लाख क्विंटलच्या पुढे गेली, तर कांदा बाजारभाव २ हजारापर्यंत खाली येऊ शकतात असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे