जुलै ते सप्टेंबर 2024 पर्यंत मकाला कसा भाव राहील ? जाणून घ्या सविस्तर….

मका हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून .ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, चीन, आणि भारत या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते. भारतामध्ये रब्बी , खरीप, व उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये मका हे पीक घेण्यात येते . प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्यप्रदेश, कर्नाटक ,महाराष्ट्र, बिहार, आणि उत्तर प्रदेश आदि राज्यात यांचा समावेश होतो. पोल्ट्रीवर ,खाद्य पशुखाद्य यासाठी भारतात मक्याचा वापर हा मुख्य प्रमाणावर केला जातो. मक्याच्या किमतीवर, मक्याची मागणी ,पुरवठा ,उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम होत असतो.

सद्यस्थितीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात मक्याच्या लागवडीचा हा काळ ओळखला जातो ,आता मक्याच्या लागवडीची तयारी सुरू आहे . मक्याचा बाजारभाव काय आहे व जुलै महिन्यात आणि पुढील सप्टेंबर महिन्यात काय भाव मिळणार हे आपण या लेखातून जाणून घेऊया , जर समजा जगातील मका उत्पादनाचा विचार केला तर 11 लाख 445 मेट्रिक टन उत्पादन 2022-23 साली झाले होते .

तर 12 लाख 145 मेट्रिक टन उत्पादन 2023-24 मध्ये झाले होते . त्यानंतर भारताचा विचार केला तर भारतात गेल्या वर्षी म्हणजे 2022-23 यावर्षी मक्याचे उत्पादन 125 लाख मेट्रिक उत्पादन झाले होते .

भारतातील निर्यात आणि महाराष्ट्रातील उत्पादन

तर भारतातील 2023 24 यावर्षीची मका निर्यात पाहिली असता जवळपास 36 लाख मीटर इतकी निर्यात झाली आहे. दुसरीकडे 2022 23 मध्ये महाराष्ट्रातील मक्याचे उत्पादन पाहिले असता बारा लाख मीटर इतके उत्पादन होते. राज्यात खरीप 2023 24 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार, मक्याच्या उत्पन्नात घट होईल असा अंदाज वर्तवला आहे . 2023-24 च्या खरीप हंगामात भारत सरकार कृषी विभागाच्या माहितीनुसार भारतात मका लागवड 82.6 लाख हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार असल्याची शक्यता आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.89 टक्के जास्त आहे.

पुढील तीन महिने बाजार कसा असेल?

महाराष्ट्रामधील नांदगाव बाजाराचा विचार केला तर मागील तीन वर्षातील मक्याच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यातील सरासरी भाव काय होते ? हे पाहुयात.

◼️ जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधी मध्ये मक्याला साधारण 1774 रुपये प्रति क्विंटलला असा दर होता.

◼️ 2157 रुपये प्रति क्विंटल दर जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये होता.

◼️ 2082 रुपये प्रति क्विंटल दर जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये होता.

◼️ 2090 प्रतिक्विंटल मका पिकाची आधारभूत किंमत 2023-24 मध्ये ही आहे.

◼️ तसेच यावर्षी जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत ही 2100 रुपये ते 2600 रुपये प्रति क्विंटल इतकी असल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *