पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल ,जाणून घ्या हवामान अंदाज ..

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गुरुवारी दिवसभर तुरळक शहर आणि उपनगरामध्ये गुरुवारी दिवसभर तुरळक पाऊस पडला. परंतु हवामान खात्याने शुक्रवार,शनिवार आणि रविवारी मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.

तर पुढच्या आठवड्यामध्ये १७, १८ आणि १९ जुलै रोजी जोरदार पावसामुळे मुंबईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे .

८ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने मुंबई ठप्प झाली होती. त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. आता परत एकदा मान्सून सक्रिय झाला. पावसाने मुंबईत गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र हजेरी लावली. अधूनमधून पावसाची पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळपासून रिपरिप चालू होती.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट..

शुक्रवार : ठाणे, रत्नागिरी, सातारा ,रायगड, पुणे,या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

शनिवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर,रत्नागिरी, जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

रविवार : रायगड, सातारा , रत्नागिरी, कोल्हापूर,सिंधुदुर्ग, आणि पुणे जिल्ह्यांना ऑरेंज दिला आहे .

सोमवार : सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, रत्नागिरी, आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

१७, १८ , १९ जुलैच्या पावसाबाबत आता बोलणे उचित होणार नाही. मात्र, शुक्रवारसह शनिवारी मुंबईला यलो अलर्ट दिला आहे . या कालावधी मध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

एकूण ३०० मिलिमीटर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाऊस पडू शकतो. शिवाय १७, १८ आणि १९ या दिवशी कदाचित मोठ्या पावसाची शक्यता आहे , पूरसदृश्य स्थिती मुंबईत निर्माण होण्याची शक्यता आहे.

१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच विदर्भात जोरदार तर खान्देशात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ जुलैपासून १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या पावसापेक्षा जास्त पावसाची शक्यता कायम जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *