राज्यात आठवडाभर कसे असेल हवामान, थंडीत होणार का वाढ…

रविवार दि. १७ नोव्हेंबर पासून थंडीत हळूहळू होत असलेली वाढ अजूनही आठवडाभर टिकून असण्याची शक्यता जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

दरम्यान आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. २६ नोव्हेंबरपर्यन्त महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नसुन ह्या आठवड्यात आकाश निरभ्रतेतून सकाळ-संध्याकाळी थंडीत अजून अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.            

सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३१ तर पहाटेचे किमान तापमान १५ ते १६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने खालावलेले आहेत.

मंगळवार दि. २६ नोव्हेंबरनंतर म्हणजे  आठवड्यानंतरही थंडीतील सातत्य हे टिकून असण्याची शक्यता ही आहेच, परंतु त्या संदर्भातील खुलासा त्यावेळच्या वातावरणीय अवस्थेनुसारच केलेले योग्य ठरेल, असे श्री. खुळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *