या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत लाल आणि उन्हाळी कांद्याचे भाव सातत्याने वाढत असून कालच्या तुलनेत आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी लाल कांद्याच्या सरासरी बाजारभावात ४०० रुपयांची, तर उन्हाळी कांद्याच्या सरासरी बाजारभावात ५०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान आज लासलगावसह नागपूर सोलापूर बाजारात कांद्याची आवक काहीशी घसरलेली दिसून आली.
कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत आज लाल कांद्याची सुमारे ६ हजार ४०० क्विंटरल इतकी आवक झाली. कमीत कमी बाजारभाव कमीत कमी बाजारभाव १५०० तर सरासरी बाजारभाव ४७०० रुपये प्रति क्विंटल असे राहिले. याच बाजारात उन्हाळी कांद्याची आवक आज ४४४ क्विंटल अशी होऊन कमीत कमी बाजारभाव ३६०० रुपये तर सरासरी बाजारभाव ५ हजार रुपये प्रति क्विंटल इतके होते.
राज्यात सोलापूर बाजारसमितीत आज लाल कांद्याची आवक घटली. सुमारे ४९ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी बाजारभाव ४०० रुपये, सरासरी बाजारभाव २ हजार रुपये, तर जास्तीत जास्त बाजारभाव ७ हजार रुपये प्रति क्विंटल असे राहिले.
पुणे बाजारसमितीत आज लोकल कांद्याची सुमारे ११ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी बाजारभाव २५०० तर सरासरी ४३५० रुपये प्रति क्विंटल असा होता. आज पुण्यात कांद्याची आवक आणि बाजारभाव दोन्हीही वाढलेले दिसून आले. आवक सुमारे २८०० क्विंटलने वाढली, तर बाजारभाव सरासरी १०० रुपयांनी वाढल्याचे दिसून आले.
दरम्यान नागपूर बाजारसमितीतही लाल आणि पांढरा दोन्ही कांद्याचे बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. लाल कांद्याला सरासरी ३६०० रु., तर पांढऱ्या कांद्याला सरासरी ३८५० रुपये भाव प्रति क्विंटल मिळाला. या ठिकाणी बाजारभावात सुमारे २०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.