तुमच्याकडे असतील हे सात कागदपत्रे ,तरच जमीन तुमच्या मालकीची आहे, जाणून घ्या कोणते सात कागदपत्रे आहेत?

तुमच्याकडे असतील हे सात कागदपत्रे ,तरच जमीन तुमच्या मालकीची आहे, जाणून घ्या कोणते सात कागदपत्रे आहेत

समाजामध्ये बऱ्याचदा आपापल्या जमिनीच्या संबंधित कुटुंबामध्ये तसेच भावा भावांमध्ये देखील अनेक प्रकारचे वाद उद्भवतात, कधीकधी ते जमिनीच्या मालकी हक्काबद्दल असतात. तर कधी कधी जमिनीच्या हद्दीवरून देखील बरीच वाद होतात कधी कधी हे वाद इतके टोकाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात.

काही प्रकरणे अशी आहेत की प्रत्यक्ष मालक दुसराच असतो आणि जमीन दुसराच व्यक्ती पिकवतो.  अशावेळी नेमका जमिनीचा मालक कोण हा प्रश्न पडत असतो ? त्यामुळे जमीन मालकीसाठी काही कागदपत्रे हे पुरावे आपल्याकडे असणे आवश्यक असतात . तसेच आपल्या फायद्याचे ठरतात यामध्ये जर आपण महत्त्वाच्या कागदपत्रांचा विचार केला तर सात कागदपत्रे आहेत जी तुम्हाला जमिनीचे मालक असल्याचे सिद्ध करतात.

खालील कागदपत्रे आहे जी तुमच्या जमिनीच्या मालकी हक्काचे पुरावे सिद्ध करतात. 

सातबारा उतारा

सातबारा उतारा शेत जमिनीचा एक आरसा असतो जमिनीच्या मालकी हक्काच्या पुराव्या च्या बाबतीत जर विचार केला तर ही एक महत्त्वाची कागदपत्रे असून या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे, ते देखील नमूद केलेले असते.  तसेच सातबारा उताऱ्यावर जमिनीची भूधारणा पद्धत देखील नमूद केलेली असते.  या पद्धतीनेच जमिनीच्या खऱ्या मालकाची ओळख सातबारा वरून होत असते. 

खाते उतारा किंवा आठअ चा उतारा. 

बरेचदा एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागल्यांची शक्यता असते.  या सगळ्या गट क्रमांक मध्ये असलेल्या शेत जमिनीची मालकी हे एकत्रित आठ अ म्हणजे खाते उताऱ्यात असते म्हणजेच गावामध्ये तुमच्या मालकीची शेत जमीन कोण कोणत्या गटात आहे.  याची सर्व माहिती या उताऱ्याच्या माध्यमातून कळते.  त्यामुळे आठ अ चा उतारा एक महत्त्वाचे कागदपत्र असून जमिनीच्या मालकी हक्काच्या पुरावा करिता महत्त्वाचे आहे. 

जमीन मोजणीचे नकाशे

जमिनीच्या मालकी संदर्भात जर काही वाद उद्भवले तर जमिनीची मोजणी करण्याची वेळ येते.  प्रामुख्याने जमिनीच्या हद्द विषयी वाद उद्भवल्यावर जमिनीची मोजणी केली जाते.  यामध्ये जमिनीची मोजणी केल्याची नकाशे तुमच्याकडे उपलब्ध असल्यास, तुमच्या त्या जमिनीवरील मालकी हक्क असल्याचे स्पष्ट होते.  त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे व्यवस्थित सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.  यामध्ये एका ठराविक गट नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहे.  त्या त्या शेतकऱ्यांची नावे आणि त्यांच्या नावावर असलेले जमिनीचे एकूण क्षेत्र यांची संपूर्ण माहिती यामध्ये असते.  नाहीतर तुमच्या शेत जमिनीला शेजारी असलेले जमिनीचा गट क्रमांक आणि शेजारी कोणता शेतकरी आहे. हे देखील तुम्हाला या माध्यमातून कळते. 

जमीन महसूल भरल्याच्या पावत्या

आपल्याला जमिनीचा महसूल प्रत्येक वर्षाला भरावा लागतो . व तो तलाठ्याकडे भरल्यानंतर त्यांच्याकडून येणाऱ्या पावत्या या संभाळून ठेवणे आवश्यक आहे.  या महसूल भरल्याच्या पावत्या देखील जमिनीच्या मालकी हक्क बाबत महत्त्वाचा पुरावा ठरतात. 

एखाद्या जमिनीचे पूर्वीचे खटले

एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल, आणि त्या जमिनीच्या बाबतीत जर या अगोदरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा खटला किंवा केस कोर्टात असेल तर अशा केसची कागदपत्रे आणि त्यातील जबाबाच्या प्रती निकालाच्या प्रत इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.  या पद्धतीने कागदपत्रे देखील भविष्यामध्ये तुमच्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. 

प्रॉपर्टी कार्ड

समजा एखादी जमीन बिगर शेती आहे.  व या जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर अशा ठिकाणी बिगर शेती जमिनीवर जर तुमचा मालकी हक्क सिद्ध करायचं असेल.  तर यासाठी लागणारा महत्त्वाचा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय.  अगदी सातबारा उताऱ्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती शेतजमीन आहे.  यासारखी माहिती या प्रॉपर्टी कार्डवर असते.  किती जमीन बिगर शेती आहे.  हे देखील प्रॉपर्टी कार्ड च्या माध्यमातून कळते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *