देशात काही दिवसापासून टोमॅटोचे दर खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. देशात काही ठिकाणी टोमॅटोचे दर 200 ते 250 रुपये किलो पर्यंत झाले आहेत. आता टोमॅटो संदर्भात आणखीन एक मोठी अपडेट समोर आलेली आहे .
येत्या काही दिवसात दिल्लीत टोमॅटोचा भाव भडकणार आहे. याचे कारण हिमाचल मधून टोमॅटोचा पुरवठा कमी होणार असून, टोमॅटोचे दर दिल्लीत तीनशे रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. बाजारातील व्यापाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित विभागाच्या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार 2 ऑगस्ट रोजी दिल्लीत टोमॅटोची सरासरी किंमत 203 रुपये होती . अधिकृत वेबसाईट नुसार देशातील सर्वात महाग टोमॅटो पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंद शहरांमध्ये 263 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात वाढ होत असताना येत्या काही दिवसात तो तीनशे रुपये किलो पर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कमी पुरवठा झाल्याने टोमॅटोचे घाऊक भाव वाढणार असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे मत आहे. अतिवृष्टीमुळे वाढत्या भागात पिकाची नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसात टोमॅटोची आवक कमी झाली असून टोमॅटोचे भाव वाढले आहेत.
लासलगावात टोमॅटोला प्रतिक्रेट ५,१०० रुपये दर.
लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भगरी बाबाधान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवारात चालू हंगामातील टोमॅटो लिलावाचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती बाळासाहेब शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या मुहूर्तावर गोंदेगाव तालुका निफाड येथील शेतकरी जालिंदर खामकर यांच्या टोमॅटो प्रति कॅरेटला पाच हजार शंभर रुपये दराने, दोस्ती ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केला . लिलावच्या दिवशी दिवसभरात एकूण 234 क्रेट मधून टोमॅटोची आवक झाली. त्या क्रेटला किमान हजार ते कमाल 5 हजार 100 तर सरासरी 2600 रुपये दर मिळाला.
त्याचप्रमाणे टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजार भाव मिळावा. टोमॅटो खरेदीदार निर्यात व्यापाऱ्यांची संख्या वाढवण्यावर बाजार समितीचे भर राहणार असून लिलावानंतर शेतकऱ्यांना तातडीने रोखीने पैसे दिले जातात.