राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे . काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
काही भागात पाऊस पडत असला तरी, अजूनही अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान काही भागात या पावसाचा शेती पिकांनाही मोठा फटका बसला आहे . तर काही भागात पावसाची गरज आहे. पावसाचा जोर हा राज्यात सध्या कमी आहे.
आजही राज्यात पावसाची शक्यता ,हवामान विभागाने वर्तवली आहे . कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच पालघर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
सातारा, रायगड, रत्नागिरी, पुणे.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग,चंद्रपूर, अमरावती कोल्हापूर,गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव,बुलडाणा नाशिक,वाशीम,जालना छत्रपती संभाजीनगर,, परभणी,वर्धा, अकोला,यवतमाळ,.