मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे –
१) धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ..
धान उत्पादकांकरिता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1600 कोटी रुपये खर्च खरीप हंगामासाठी येईल.
२) विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय..
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवास शाळांमध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.आता सध्या धनगर समाजातील 5500 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे . आता या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार असून दरवर्षी 10 हजारापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे . यासाठी सरकारने 114 कोटी 45 लाख रुपये येणाऱ्या खर्चास मंजुरी दिली आहे.
३) राधानगरीचा सह्याद्री साखर कारखाना बीओटी तत्त्वावर
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील धामोड मधील सह्याद्री सहकारी साखर कारखाना बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर 25 वर्षांकरिता चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरील संदर्भात काढण्यात निविदा येणार आहे, शर्तीं व अटी च्या आधारे कंपनीची निवड करण्यात येणार आहे .
४) जुने वीज टान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज योजना
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जुने टान्सफॉर्मर्स (रोहित्रे) बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी 1600 कोटी रुपये खर्च लागणार आहे त्यापैकी 200 कोटी2023-24 मध्ये, 480 कोटी 2024-25 मध्ये आणि 480 कोटी 2025-2026 मध्ये अशा खर्चास मंजुरी देण्यात आली. 340 कोटी टान्सफॉर्मर्सचे ऑईल बदलण्यासाठी देखील मान्यता देण्यात आली आहे.
५) निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ..
राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये 10 हजार रुपये ठोक वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्च 2024 पासून आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (कनिष्ठ आणि वरिष्ठ) ,सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाच्या महागाई भत्त्यासह प्रति महिना 10 हजार रुपये वाढ करण्यात येणार आहे.
६) हिरडा शेतमालाच्या नुकसानीसाठी मदत
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यामध्ये व जुन्नर तालुक्यामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. या नुकसानीसाठी 15 कोटी 48 लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे .
७) वाहतूक भत्ता दिव्यांग शिक्षकांना लागू..
आजच्या बैठकीत दिव्यांग जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ 52 विशेष तज्ज्ञ व 158 विशेष शिक्षक , 6 दिव्यांग जिल्हा समन्वयक, अशा 216 कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. .
८) वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी वस्त्रोद्योग धोरणामध्ये सुधारणा..
राज्यामध्ये या अगोदर जाहीर केलेल्या शाश्वत व एकात्मिक वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मध्ये सुधारणा करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अनुदानाबाबतच्या तरतूदीत या निर्णयानुसार सुधारणा करण्यात येणार आहे. संपूर्ण धोरण कालावधीमध्ये वीज अनुदानासाठी कोणत्याही प्रकारची कमाल मर्यादा नाही . वस्त्रोद्योग घटकांना ( नवीन व विद्यमान) 4.80 कोटी रुपयांपैकी जे कमी असेल तेवढे भांडवली अनुदान किंवा प्रकल्प किंमतीच्या 20 टक्के सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेसाठी अनुदान देणार येणार आहे.
९) नागपूर विदर्भ साहित्य संघाला 10 कोटी रुपये इतका निधी देण्यात येईल .
10 कोटी रुपये इतका निधी नागपूर विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देण्यास मंजुरी दिली आहे.
१०) कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेस मन्यता..
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामधील जामशेत लघु पाटबंधारे योजनेला मंजी देण्यात आली आहे. वरील योजना गिरणा नदीच्या खोऱ्यात जामशेत नाल्यावर असून कळवण तालुक्यापासून पासून 20 कि.मी. अंतरावर प्रस्तावित धरण स्थळ आहे. या योजनेत 227 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणि 1 हजार 30 सघमी पाणी साठा आणण्याचे नियोजन आहे.