राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोदावरी कोरला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले .
केंद्र सरकारने राज्यातील अनेक योजनांना पाठबळ देण्याचे काम केले आहे .अहमदनगर जिल्ह्यामधील काकडी येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या अभियानाच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.
एकाच छताखाली नागरिकांना अनेक योजनांचा लाभ
अहमदनगर जिल्ह्यामधील 24 लाख नागरिकांना शासन आपल्या दारी या अभियानाचा लाभ देण्यात आलेला आहे राज्यातील एक कोटी 40 लाख लाभार्थ्यांना आजपर्यंत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे नागरिकांना कामासाठी चक्रा मारायला लागू नये यासाठी शासन काम करत आहे.
शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे समृद्धी महामार्गामुळे नवे पर्व सुरू
राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याची काम केंद्र शासनाने केले आहेराज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आजही राज्यातील निम्म्या साखरेची उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे समृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे निळवंडे प्रकल्प 53 वर्ष पासून रखडलेला असून त्याचे काम शासनाने मार्गी लावले आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत शासनाने नव्याने 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे