
Santosh Deshmukh: खरा आका वेगळाच हे तर फक्त प्याद आकाच्या आकान यावर बोललं पाहिजे आकाच्या ड्रायव्हरची संपत्ती एवढी कशी आमदार सुरेश दस यांचे हे आरोप फक्त परळीमध्ये नाही तर सगळ्या महाराष्ट्रात गाजतायेत या आरोपांमधून सुरेश दस कधी वाल्मिक कराडला टार्गेट करतात तर कधी मंत्री धनंजय मुंडे यांना. दुसऱ्या बाजूला सीआयडीन वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे का खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण यांचा परस्पर संबंध आहे का हे तपासण्यासाठी वाल्मिक कराडची 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी मागितली होती पण मागच्या दहा दिवसात या दोन्ही गोष्टींच्या तपासात सीआयडी ला यश आलं नाही असं बोललं जातंय,
त्यात आरोपी सुदर्शन घुलेच्या वकिलांनी कोर्टात विष्णू चाटे हाच खरा आका आहे असा युक्तिवाद करत या सगळ्या प्रकरणात ट्विस्ट आणला होता मुळात या सगळ्या प्रकरणात दररोज एक नवं नाव पुढे येतंय ज्यामुळे गुंता आणखी वाढतोय पण हा गुंता आहे कसा कुणाचे संबंध कुणाशी आहेत या संबंध संबंधांची लिंक कशी लावली जात आहे पाहूयात या लेखा मधून.
नमस्कार तुम्ही वाचत आहात कृषि २४ तास(krishi24.com)आधी बघूयात या सगळ्यात कुणा कुणावर आरोप झाले तर प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, जयराम साठे, महेश केदार, यांच्यावर संतोष देशमुख यांची हत्या केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, आणि विष्णू साठे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितल्याचं प्रकरण अशा दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल आहे तर वाल्मीक कराड वर फक्त खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
आत्तापर्यंत या आरोपींपैकी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही वाल्मिक कराडनं पुण्यात सीआयडी पुढे सरेंडर केलं तर बाकीच्या आरोपींना अटक करण्यात यश मिळालं पण या सगळ्या आरोपींचं एकमेकांशी काय कनेक्शन आहे.
सुरुवात करूयात सुदर्शन घुले पासून 6 डिसेंबरला मस्ताजोग मध्ये असलेल्या अवादा कंपनीमध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांचे सहकारी तिथे आले तिथल्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावलं त्यानंतर मारहाणीची घटना घडली असे आरोप कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या एफआयआर मध्ये केले त्यानंतर मस्ताजोगचे काही तरुण मध्ये पडले ज्यात संतोष देशमुख यांचाही समावेश होता
सुदर्शन गोले आणि त्याच्या सहकाऱ्यांना अडवण्यासाठी मस्ताजोग मधला एक सुरक्षा रक्षक सुद्धा मध्ये पडला होता पण त्यांनी त्याला सुद्धा मारहाण केली आणि मग गोले आणि त्याचे सहकारी आणि मस्साजोग मधले तरुण यांच्यात मारहाण झाली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगण्यात आलं यामुळे आपला अपमान झाला आणि त्यासाठी सरपंच यांचं संतोष देशमुख जबाबदार आहेत या समजातून त्यांनी देशमुख यांना टार्गेट केल्याचं सांगण्यात आलं
संतोष देशमुख यांचं अपहरण झालं ते 93 नंबरच्या स्कॉर्पियो मधून ही स्कॉर्पियो होती सुदर्शन घुलेची सातवी पर्यंत शिकलेल्या घुलेचं घर पत्र्याचे पण तो गाडी वापरतो स्कॉर्पियो साहजिकच प्रश्न पडतो कशाच्या जोरावर तर सुदर्शन घुले साखर कारखानदारांसाठी काम करतो असं सांगण्यात येतं बीड मधल्या अनेक जण ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात जात असतात यासाठी अनेक मुकादम काम करतात पण बऱ्याचदा हे मुकादम कारखानदारांकडून उचल घेतात पण मजूर नेत नाहीत बऱ्याचदा मजूर मुकादमांकडून पैसे घेतात पण तोडणीसाठी जात नाहीत मग अशा प्रकरणात तक्रारी जातात सुदर्शन गुलेकडे
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गुले आणि त्याचे साथीदार अशा लोकांना उचलतात कारखानदार किंवा मुकादमाच्या पुढे हजर करतात याच कामामुळे त्यांची दहशत निर्माण होते त्याच्यावर या आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये खंडणीचा एक, अपहरणाचा एक, पण खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचे काही गुन्हे दाखल होते प्रतीक घुले हा सुद्धा सुदर्शनचा सहकारी ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी सकाळी प्रतीक घुलेनं सुदर्शन घुलेचा फोनवर बोलतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता या पोस्टमध्ये हॅशटॅग सुदर्शन भैया घुले विरोधकांचा बाप असंही लिहिलं होतं
प्रतीक घुले हा सुद्धा टाकळीचाच 24 वर्षांच्या प्रतीक वर मागच्या आठ वर्षात पाच गुन्हे दाखल आहेत यात दुखापत करणे, मारहाण करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे जयराम साठे केसच्या तांब्यामधला 21 वर्षांचा तरुण त्याच्यावर मागच्या दोन वर्षात दुखापत करणे, खूनाचा प्रयत्न असे तीन गुन्हे दाखल आहेत. कृष्णा आंधळे या धारूरच्या मैंदवाडी मधला त्याच्यावर मागच्या चार वर्षात सहा गुन्हे दाखल आहेत त्याच गावच्या महेश केदार वर सुद्धा पाच गुन्हे दाखल आहेत सुधीर सांगळे सोडला तर यातल्या प्रत्येकाचा इतिहास हा गुन्ह्यांचा राहिला आहे.
या सगळ्यांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत या सगळ्यांची वय आहेत 30 च्या आतली या सगळ्यांवर एकाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि यातले बरेच जण कंपनीचे सदस्य आहेत कंपनी कुठली तर 33 33 या कंपनीचा मोरक्या स्वतःच्या स्कॉर्पियो मध्ये बसला तरी त्याच्या मागे गाड्यांचा ताफा असल्याचे तो गाडी मधून उतरला की लोक त्याच्या पुढे पुढे करतात हे दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत हा मोरक्या म्हणजे सुदर्शन घुले जो विरोधकांचा बाप आहे असा दावा अटकेत असणारा दुसरा आरोपी प्रतीक घुले, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीच करतो हे सगळेजण समवयस्क असले तरी यांचा मोरक्या म्हणून चर्चा होते सुदर्शन घुलेचीच
पण मग सुदर्शन घुलेच्या वरती कोण आहे हा प्रश्न चर्चेत आल्यावर एक नाव पुढे येतं विष्णू चाटे, चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचं नाव पुढे आल्यानंतर त्याला या पदावरून बाजूला करण्यात आलं मुळात चाटेवर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता पण आता मात्र तो खंडणी आणि हत्या अशा दोन्ही प्रकरणात आरोपी आहे चाटेच्या फोनवरून वाल्मिकन आपल्याला खंडणीसाठी धमकी दिली असं सुनील शिंदे यांनी एफआयआर नोंदवताना म्हणलंय त्यात धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांचा अपहरण झाल्यावर आपण विष्णू चाट्याला अनेक फोन केले ज्यावर तो तुमच्या भावाला आणून सोडायला सांगतो असंच उत्तर देत राहिला पण प्रत्यक्षात मात्र देशमुख यांचा मृतदेह सापडला साहजिकच खंडणी आणि हत्या अशा दोन्ही प्रकरणांमध्ये विष्णू चाटे आरोपी आहे
पण त्याचा आणि सुदर्शन घुलेचा काय संबंध तर विष्णू चाटे ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करायचा त्यानं अशाच 15 पेक्षा जास्त मुकादमांची एक लॉबी तयार केली होती या लॉबीचं तो नेतृत्व करायचा त्यामुळं या क्षेत्रात विष्णू चाटेचं वजन निर्माण झालं दरम्यान ऊसतोड कामगारांच्या टोळ्यांच्या माध्यमातून विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले संपर्कात आले. घुलेच्या या कामातली पकड पाहून दोघांची मैत्री जमली गेल्या दहा वर्षात सुदर्शन घुले वर वेगवेगळे दहा गुन्हे दाखल झाले असले तरी चाटेच्या सपोर्टमुळे गुलेला राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा होते घुले चाटेच्या माध्यमातूनच जास्त ताकदीने पुढे आला असंही स्थानिक पत्रकार सांगतात.
सुदर्शन घुलेचा खास असणारा प्रतीक घुले विष्णू साठेच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट करतो त्याला भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणतो भाऊ तुम्ही ठरवाल ते धोरण, लावाल ते तोरण वाट पाहतोय तुमच्या आदेशाची आमचं हक्काचं प्रेरणास्थान विष्णू चाटे हॅशटॅग 333 अशा कॅप्शन लिहितो साहजिकच गुले आणि चाटेच कनेक्शन आणि यांच्यात गुलेच्या वरती कोण याचं चित्र स्पष्ट होतं.
आता शेवटचा प्रश्न म्हणजे आका म्हणून चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचं या सगळ्याशी काय कनेक्शन तर सुनील शिंदे यांनी तक्रार करताना वाल्मिक कराडचं नाव घेतलं चाटेच्या फोनवरून कराडनं धमकी दिली शिवाजी थोपटे यांना कराडच्या ऑफिसला बोलावून घेण्यात आलं कराडनं गुले सांगतोय तसं कर नाहीतर परिणाम गंभीर होतील अशी धमकी दिल्याचं एफआयआर मध्ये सांगितलं होतं साहजिकच या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड कनेक्शन जोडलं गेलं.
सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांचे सोशल मीडियावर वाल्मिक कराड सोबत अनेक फोटो आहेत कराड अभिनंदन करतानाच आहे कराडनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे अनेक फोटो आहेत असेच फोटो विष्णू चाटेचे सुद्धा आहेत आपण कायम वाल्मिक कराड सोबतच आहोत असं तो त्याच्या सोशल मीडिया पोस्ट मधून सांगत आलाय. वाल्मिक कराडची बीड मधली ओळख ही शाडो पालकमंत्री अशी होती त्याचा सगळ्या यंत्रणेवर होल्ड होता आणि अजूनही आहे असाही आरोप होतोय त्यामुळेच सुरेश धस यांनी सुद्धा वाल्मिक कराडलाच आका म्हणत लक्ष केलंय.
पण बाकीची प्यादी म्हणजे नेमकं कोण आणि किती महेश केदार, जयराम साठे हे सुदर्शन घुलेच्या संपर्कात होते तर देशमुखांच्या लोकेशनची टीप देणारा सिद्धार्थ सोनवणे कुणाच्या संपर्कात होता हा प्रश्न आहेच त्यामुळे आका कोण याचं उत्तर दसांच्या आरोपांमुळे वाल्मिक कराड असं दिलं जात असलं तरी प्रत्येक प्यादाचा वेगळा आका आणि त्या आकाचा अजून एक आका हाच अद्याप न सुटलेला बीड मधला गुंता आहे.