kanda bajarbhav: बांग्लादेशच्या सीमेवर असा काय घोळ झाला की कांदा बाजारभाव पडले .

kanda bajarbhav1

kanda bajarbhav : मागील काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव स्थिर असले, तरी दबावात आहेत. मात्र दोन दिवसांपासून कांदा बाजारभावात खूप घसरण झाली असून काल दिनांक १० जानेवारी रोजी लासलगाव बाजारात कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरीच्या खाली येऊन १९०० रुपयांवर स्थिरावले. तर राज्याचा आढावा घेतल्यास बऱ्याच ठिकाणी कांदा बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास आहेत.

मकर संक्रांतीला दक्षिण भारतात सणामुळे कांदा मागणी वाढते, त्यामुळे सध्या तरी बाजार टिकून आहेत मात्र बांग्लादेशच्या निर्यातीमुळे सध्या बाजारभावावर दबाव आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून व्यापारी, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी हे कांद्यावरील निर्यातशुल्क २० टक्के काढून टाकावे आणि निर्यात मुक्त करावी अशी मागणी करत आहेत. याचे कारण म्हणजे निर्यात शुल्क जर काढले तर शेतकऱ्यांच्या कांद्याला चार ते पाच रुपयांनी बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा आहे.

बाजारभाव ९ रुपये आणि शुल्क ४५ रुपयांचे
दरम्यान बांग्लादेशला जाणाऱ्या कांद्याबाबत सरकारी पातळीवर वेगळचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तो म्हणजे निर्यात होणाऱ्या कांद्यावर २० टक्के कांदा निर्यात शुल्क घेतले जात आहे. पण ते अतिशय जास्त आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सद्‌या बांगला देशात गोल्टी कांदा निर्यात होतो. त्याची किंमत साधारणत: ७ ते १० रुपये प्रति किलो असते. त्यावर २० टक्के प्रमाणे दीड ते २ रुपये निर्यात शुल्क आकारायला हवे. पण सद्या सरकारी यंत्रणेतील घोळामुळे किंवा तेथील संगणकीय घोळामुळे हे निर्यातशुल्क ९ ते साडे नऊ रुपये आकारले जात आहे.

थोडक्यात संबंधित कांद्याची किंमत ४५ रुपये प्रति क्विंटल धरून त्यावर हे निर्यात शुल्क आकारले जात आहे. परिणामी हा कांदा बांग्लादेशसाठी महाग होताना दिसत असून शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात सरकारने तातडीने बदल करावेत अशी व्यापाऱ्यांची आणि कांदा निर्यातदारांची मागणी आहे.

दरम्यान मागील दोन दिवसांपासून बांग्लादेशमधून आलेल्या एका बातमीमुळेही येथील बाजार दबावात आले आहेत. बांग्लादेशात यंदा खरीप कांद्याचे ३० टक्के अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे तेथील निर्यातीची गरज कमी होणार आहे. त्याचाच परिणाम म्हणून कांद्याचे बाजारभाव घटले आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply