Soybean Bajarbhav : सांगलीत पिवळ्या सोयाबीनला मिळाला राज्यातला सर्वाधिक भाव..

Soybean Bajarbhav:  शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी राज्यात सोयाबीनची एकूण सुमारे ५० हजार क्विंटल आवक झाली. मागील तीन दिवसांपासून सोयाबीनची बाजारातील आवक घटताना दिसत आहे. गुरुवारी सुमारे ८८ हजार क्विंटल, बुधवारी सुमारे ९३ हजार, तर मंगळवारी व सोमवारी सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल अशी आवक झाली.

राज्यात सांगली आणि जळगाव या दोन ठिकाणी बाजार समितीत सुरू झालेल्या हमीभाव खरेदी केंद्रामुळे सोयाबीनला हमीभावा इतका म्हणजेच ४८९२ रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला. सांगली बाजारात पिवळ्या सोयाबीनची ७८ क्विंटल, तर जळगाव बाजारात १४१ क्विंटल आवक झाली.

दरम्यान लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १३ हजार ९५३ क्विंटल आवक होऊन कमीत कमी ३८०० रुपये तर सरासरी ३९८७ रुपये बाजारभाव मिळाला.

अमरावती बाजारात लोकल सोयाबीनला ३८६० तर पिवळ्या सोयाबीनला ३८९८ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. धाराशिवमध्ये सोयाबीनला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळाला.

Leave a Reply