Price for trumpet : मराठवाडा आणि विदर्भातील अनेक बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहेत. मात्र काही बाजार असे आहेत की तिथे तुरीला हमीभावाच्या आसपास बाजारभाव मिळताना दिसत आहे. तर एका बाजारात तुरीला हमीभावापेक्षाही जास्त बाजारभाव मिळाला आहे.
मोहोळ, गंगापूर, मंठा, तुळजापूर शेवगाव-भोदेगाव या बाजारात पांढऱ्या तुरीला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. तुलनेने लाल आणि काळ्या तुरीचे दर कितीतरी अधिक आहेत.
दरम्यान अकोला बाजारात शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी लाल तुरीची साधारणत: २८०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी ६४४५ रुपये, जास्तीत जास्त ७७०५, तर सरासरी ७७०५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. अमरावती बाजारात लाल तुरीची सुमारे ७ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी ७ हजार रुपये, जास्तीत जास्त ७५०० रुपये आणि सरासरी ७२०० रुपये बाजारभाव मिळाले.
जालना आणि मंठा बाजारात काळ्या तुरीची अनुक्रमे १२ आणि २ क्विंटल आवक झाली. जालना बाजारात सरासरी ९२०० तर मंठा बाजारात सरासरी ९ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. विदर्भातील कारंजा बाजारात लाल तुरीची ३ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी ७६५५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.












