कोण-कोणत्या पीक उत्पादनात मधमाशांमुळे 5 ते 40 टक्क्यांची वाढ होते? जाणून घ्या सविस्तर …

आहारातील एक तृतीयांश भाग पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळतो. पीक उत्पादनात 5 ते 40 टक्क्यांची वाढ ही मधमाशांमुळे (Bees) होणाऱ्या परागीभवनाद्वारे होते. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील (Dr. C. S. Patil) यांनी मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे . मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ते बोलत होते.

मधमाशांसाठी कीडनाशकांचा अतिरेकी वापर घातक

आहारातील एक तृतीयांश भाग पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळतो. परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. 5 ते 40 टक्क्यांपर्यंत पीक उत्पादनात मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे वाढ झाली आहे. संशोधनामध्ये असे पुढे आले की , उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक होते, मधमाशांसाठी कीडनाशकांचा अतिरेकी वापर घातक ठरत आहे. त्यामुळे कीडनाशकांचा अंश मधामध्ये आढळून येत आहे, हे जास्त धोकादायक आहे. 329 किडनाशके किडनाशक मंडळाने प्रमाणित केली आहेत. तीच शेतकऱ्यांनी किडनाशके वापरावीत. मधमाशा कीडनाशकांमुळे नष्ट होत आहेत. मधमाशाना वाचवायचे असेल, तर कीडनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही पाटील यावेळी म्हणाले.

कोण – कोणत्या पिक उत्पादनात किती होते वाढ?

तेलबिया,विविध फळे, भाज्या, धान्य, आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. परागीभवना मध्ये निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया असते. यात मधमाशांचा सर्वात जास्त हातभार हा असतो . तसेच पिकांना कीटकांपासून वाचविण्यातही मदत होत असते. मधमाशांमुळे परागीभवन झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होणारी विविध पिके आहेत. तेलवर्गीय मोहरीत 43 टक्के, सूर्यफुलात 32 ते 48 टक्के, करडईत 28 टक्के, एरंडी 30, जवस 17 ते 40, नायगर 22 टक्के ,तीळ 22 ते 37, सोयाबीन 19 टक्के, उत्पादन वाढ झाल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

मधा मध्ये पौष्टिक घटक , औषधी गुणधर्म आढळतात ..

मधमाशांपासून मिळणारे मध हे सर्वात पौष्टिक अन्न मानले जाते. मधाची ओळख ही स्वरामध्ये सुधारणा, डोळ्यासाठी हितकारक,बुद्धीधारणक्षमता वाढविणारा म्हणून आहे. मध खोकला, पित्त, कफ, क्षय, कर्करोग, मधुमेह, ह्दयरोग, मळमळ यावर गुणकारी आहे. तसेच भूक वाढवण्यासाठीही तो उपयुक्त आहे.त्यामुळे मधमाशांच्या संवर्धनासाठी आपण फुले देणाऱ्या झाडांची लागवड करण्याबरोबरच सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. मधमाशांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करावी व किमान शेतात एक तरी मधमाशी वसाहत असावी अशी व्यवस्था केली पाहिजे. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा आपण शेतामध्ये कमीत कमी वापर केला पाहिजे. मधमाशींच्या पोळ्याचे आपल्या शेतात संगोपन केले पाहिजे. वेगवेगळ्या हवामानात मधमाशी पेट्यांची काळजी घेणे गरजेचे असते

मध काढण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा …

मधमाशी ही अर्धा ते एक किलोमीटर भागात एक पोळी फिरून तयार करते. परागीभवणासाठी फुलोरी मधमाशी ही अत्यंत उपयुक्त आहे. मधमाशीचे एक पोळे नष्ट केले तर त्या सभोतालच्या शेतातील उभे पिक नष्ट करण्यासारखे आहे. त्यामुळे मध काढण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा. मध असलेला भाग मधाच्या पोळ्यामध्ये फुगीर होतो. तेवढा भाग वेगळा काढून मधमाशीचे पोळे आपण वाचवू शकतो. तज्ज्ञांनी माहिती दिल्यानुसार, त्या पोळ्यावरती बाहेर गेलेल्या माशा त्यावर परत येतात,

मधमाशांच्या या मुख्य जाती आहेत ?

मधमाशांच्या फुलोरी माशी आणि आग्या माशी या दोन जाती आहेत. तर पेटीत पाळता येणाऱ्या सातेरी, मेलीफेरा आणि ट्रायगोना कोती या मधमाशा आहेत. फुलोरी मधमाशी पेटीत घेतली जाते त्याचे मुख्य कारण म्हणजे ही स्थानिक मधमाशी आहे. तसेच ती स्थानिक हवामानाशी जुळलेली असते. त्यामुळे फुलोरी मधमाशी खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक पिकांच्या फुलांवर ती आढळते तसेच फुलोरी मधमाशी चा परागीभवनाच्या प्रक्रियेत खूप मोठा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *