Crop compensation : पिकाची नुकसानभरपाई मिळत नसेल तर करू शकता या नंबरवर कॉल , पहा सविस्तर …

पिक विमा काढताना विमा कंपन्या मोठमोठे आश्वासने देतात, मात्र नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांची नासाडी झाली की, अनेक वेळा कंपन्या दावे देताना शेतकर्‍यांना अनेक वेळा हेलपाटे घालायला लावतात आणि औपचारिकतेच्या नावाखाली त्रास देतात. शेतकऱ्यांच्या अशाच समस्या लक्षात घेऊन , कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय कडून पीक विमा दाव्यांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ते सुरू होण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ आतापर्यंत 37 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे. तीन कोटी 12 लाख शेतकरी 2023 मध्ये या योजनेत सामील झाले आहेत.प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्यांना विमा मिळतो, परंतु पीक निकामी झाल्यानंतर ते दावा करतात व दावा केल्यानंतर त्याचे स्‍टेटस (दाव्याची स्थिती) काय आहे, पीकविमा केव्हा मिळण्याची शक्यता आहे जेणेकरून ते पुढील पिकाची तयारी करू शकतील? मात्र आता शेतकऱ्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय टोल फ्री क्रमांक 14447 जारी करेल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी संबंधित सर्व समस्या एका फोन कॉलवर सोडवल्या जातील.त्याच्या दाव्याची स्थिती जाणून घेऊ शकेल देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील शेतकरी आणि पिकविम्यासंबंधित तक्रार करू शकेल. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झालाने , हा नंबर संपूर्ण देशासाठी लॉन्च करण्यात येणार आहे. टोल फ्री क्रमांक पूर्णपणे तयार असून , पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अशाप्रकारे ही समस्या दूर कारण्यात येईल.

ओळखपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांना या टोल फ्री क्रमांक 14447 वर कॉल करावा लागेल व विम्याशी संबंधित कागदपत्रे आणि नैसर्गिक आपत्तीची माहिती द्यावी लागेल. यानंतर त्यांना एक ओळखपत्र दिले जाईल.एवढेच नाही तर शेतकऱ्यांना तक्रार नोंदवल्यानंतर एक एसएमएस मिळणार आहे. जेव्हा शेतकऱ्याला त्याच्या तक्रारीचा पाठपुरावा करायचा असेल तेव्हा त्याला फोन करून त्याचा ओळखपत्र द्यावा लागेल, त्याची स्थिती उपलब्ध होईल.

Leave a Reply