
गेल्या दोन वर्षांपासून लसणाची लागवड कमी प्रमाणात झाली आहे त्याचबरोबर उत्पादनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे लसणाची बाजारात कमी आवक होत आहे, त्यामुळे दरामध्ये सुधारणा होत आहे . घाऊक बाजारामध्ये प्रतिकिलो १५०-३०० रुपयांवर असलेले लसूण आता २००-४०० रुपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील गावरान तसेच परराज्यातील लसणाच्या लागवडीत घट होत आहे. तसेच गेल्या वर्षीही लसणाच्या दराने उच्चांक गाठला होता.शेतकऱ्यांनी त्यामुळे गेल्या वर्षीचा नवीन लसूण विक्रीसाठी बाहेर काढला होता. त्यामुळे या वर्षी लसणाची साठवणूक केलेली नाही. त्यामुळे यंदा साठवणुकीचा लसूण कमी आहे.
राज्यातील सर्वच बाजारात परराज्यातील आवक घटली आहे. मागील काही दिवसांपासून वाशीतील एपीएमसी बाजारात ९ ते १२ गाड्या आवक होत असून सोमवारी १५ गाड्या मिळून एकूण ३९१७ गोण्या लसूण आवक झाली. तसेच मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दरात वाढ होत आहे. सध्या लासणाची आवक मध्यप्रदेशमधील होत असून पुढील कालावधीमध्ये लसूण आणखी महाग होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून लसणाचे उत्पादन कमी आहे. लागवड कमी झाल्यामुळे उत्पादनात घट निर्माण होत आहे . मागील वर्षी दराने उच्चांक गाठला होता त्यामुळे तेव्हा बहुतांश लसूण विक्रीसाठी बाहेर काढला होता त्यामुळे यंदा लसणाची साठवणूक कमी आहे. आवक कमी झाल्याने दरात तेजी आहे. – महेश राऊत, घाऊक व्यापारी, कांदा बटाटा बाजार एपीएमसी