इस्रोनं 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पाठवले . आता चांद्रयान-3 चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरत आहे.
चांद्रयानाने चंद्राचे पहिले छायाचित्रे पाठवले आहे. प्रत्येक छायाचित्रा मध्ये डाव्या बाजूला दिसत असलेले गोल्डन रंगाचे यंत्र चांद्रयानाचे सोलार पॅनल आहे. या मध्ये चंद्राचा पृष्ठभाग आणि त्यावरील मोठमोठे खड्डे समोर दिसत आहेत.
9 ऑगस्ट रोजी दुपारी 2.45 च्या सुमारास त्याची कक्षा 4 ते 5 हजार किलोमीटरच्या कक्षेत बदलली जाईल. प्रत्येक छायाचित्रा मध्ये चंद्र आणखी स्पष्ट आणि मोठा दिसेल.
14 ऑगस्ट रोजी दुपारी ते 1000 किलोमीटरपर्यंत कमी होईल. पाचव्या ऑर्बिट मॅन्युव्हरमध्ये, ते 100 किमीच्या कक्षेत पाठवलं जाईल. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील.
18 आणि 20 ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंग होईल. म्हणजेच, चंद्राच्या कक्षेतील अंतर कमी होईल. लँडर मॉड्यूल 100 x 35 किमीच्या कक्षेत जाईल. यानंतर 23 रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चांद्रयानचे लँडिंग केलं जाईल.
चंद्राची कक्षा पकडण्यासाठी चांद्रयान-3 चा वेग ताशी 3600 किलोमीटर इतका वाढवण्यात आला. कारण चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहापट कमी आहे. जर जास्त वेग असता तर चांद्रयानाने तो पार केला असता.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानचा वेग 2 किंवा 1 किलोमीटर प्रति सेकंद कमी केला. यामुळेच चांद्रयान चंद्राची कक्षा पकडू शकला. आता हळूहळू चंद्राभोवतीच्या कक्षेतील अंतर कमी करून ते दक्षिण ध्रुवाजवळ उतरवलं जाईल.
चांद्रयान-3 यापूर्वी ट्रान्स लूनर ट्रॅजेक्टोरीमध्ये 288 x 369328 किलोमीटर अंतरावर प्रवास करत होते . जर ते चंद्राची कक्षा पकडू शकले नसते . तर 230 तासांनंतर ते पृथ्वीच्या पाचव्या श्रेणीच्या कक्षेत परत आले असते. इस्रोला पुन्हा चंद्रावर यान पाठवण्यासाठी दुसरा प्रयत्न करावा लागला असता.
आतापर्यंतच्या जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या चंद्रावर जाण्याच्या मोहिमा पाहिल्या तर, ज्या-ज्या देशांनी थेट चंद्राच्या दिशेने रॉकेट पाठवले , त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
तीनपैकी एक मोहीम अयशस्वी झाली. पण इस्रोनं जो मार्ग आणि पद्धत निवडली, त्यात अपयश येण्याची शक्यता फारच कमी आहे. तर यशस्वीरित्या आपलं मिशन पूर्ण करण्याची शक्यता जास्त आहे.