टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टोमॅटोचे भाव दीडशे रुपये ते दोनशे रुपये किलो च्या पुढे गेले आहे . गेल्या दीड महिन्यापासून टोमॅटो चे भाव वाढ सुरू आहे.
टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होऊ शकते ,असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या कांद्याचा भाव किरकोळ बाजार मध्ये 25 रुपये पर्यंत आहे. सर्वसामान्यांच्या खिशांवर परवडणारा हा दर येत्या काही दिवसात साठ रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे.
कांद्याचे दर वाढण्याची शक्यता
स्वयंपाक घरामध्ये टोमॅटोचा तुटवडा चालू शकतो. पण कांद्याच्या भावात वाढ झाल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते . कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याच्या वाढत्या दराचा परिणाम किरकोळ बाजारात दिसून येईल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत एक किलो कांद्याचा भाव 60 ते 70 रुपयांपर्यंत जाईल.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एवढ्या वाढीनंतरही कांद्याचे भाव 2020 मध्ये वाढलेल्या कांद्याची किमतीपेक्षा कमीच राहणार आहेत. 2020 मध्ये कांद्याच्या भावाने शंभर ते 120 रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता.
अस्थिरतेमुळे अधिक विक्री
रब्बी कांद्याच्या साठवणुकीचा आणि वापरण्याचा कालावधी दोन महिन्यांनी कमी झालेला आहे . यावर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये बाजारातील अस्थिरतेमुळे खुल्या बाजारात रब्बीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी सप्टेंबर ऐवजी ऑगस्ट च्या लक्षणीय रित्या कांद्याचे साठे घसरण्याची शक्यता आहे ,असे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच कांद्याची टंचाई होण्याची शक्यता आहे.
स्वस्ताईसाठी आता दिवाळीची प्रतीक्षा
खरिपाची आवक ऑक्टोबरपासून सुरू झाल्याने कांद्याचा पुरवठा अधिक चांगला होईल. त्यामुळे दर कमी कमी होतील . सणासुदीच्या महिन्यांत (ऑक्टोबर-डिसेंबर) किंमतीतील अस्थिरता दूर होण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारी-मे दरम्यान कांद्याचे दर घसरतील . मात्र, शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरण्याकडे पाठ फिरवली आहे. तरीही कांद्याची टंचाई जाणवणार नाही असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.