red gram market price : आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात अकोला बाजारात काबुली हरभऱ्याची सुमारे १३३, तर लोकल वाणाच्या हरभऱ्याची ४८८० क्विंटल अनुक्रमे आवक झाली.
लोकल वाणाच्या हरभऱ्याला कमीत कमी ४७९५ रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त ५९१० रुपये प्रति क्विंटल, आणि सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. तर काबुली हरभऱ्याला सरासरी ८ हजार ५०० रुपये बाजारभाव सरासरी मिळाला.
नागपूर बाजारात आज ३६११ क्विंटल आवक होऊन सरासरी ५५०७ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कर्जत-नगर बाजारात ५२०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. दरम्यान जळगाव बाजारात लाल हरभऱ्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. लाल हरभऱ्याची या ठिकाणी ५७ क्विंटल आवक झाली, किमान ९ हजार, कमाल ९ हजार ५०० रुपये तर सरासरी ९ हजार ३०० रुपये बाजारभाव मिळाला.
हिंगोली बाजारात १८०० क्विंटल आवक होऊन किमान ५ हजार, कमाल ५४३५, तर सरासरी ५२१७ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.












