देशभरात १ ऑक्टोबर 2023 पासून जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 लागू केला जाणार आहे . त्या कायद्या मुळे वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल, विवाह नोंदणी करायची असेल , शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर या सगळ्या कामांसाठी जन्मदाखला हा एकमेव कागदाचा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे.
जन्म दाखल्यावरील नावात चूक असेल तर ती दुरुस्त कशी करायची ? जन्माची नोंद आहे पण त्याच्यामध्ये नाव समाविष्ट नाही, तर ते नाव कसे समाविष्ट करायचे? याबाबत या लेखामध्ये माहिती आपण पाहणार अहोत. बाळाचा जन्म झाला की दवाखान्या कडून जन्मप्रमाणपत्र दिले जाते . पण बऱ्याचदा पालकांकडून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जन्मदाखला घ्यायचे गडबडीत राहून जाते .अशावेळी जन्माची नोंद तर आहे, पण जन्मदाखल्यात नाव समाविष्ट नाही अशी स्थिती निर्माण होते . त्यामुळे बाळाचं नाव जन्मदाखल्यात समाविष्ट करणे अपरिहार्य किंवा बंधनकारक असते . आता हे करून घेण्यासाठी काय करायचं आहे . तर यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करून दिली आहे . राज्यातील ज्या नागरिकांची किंवा त्यांच्या पाल्याचे जन्म दाखल्यात नाव समाविष्ट नाही आणि त्याला पंधरावर्ष पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असे नागरिक जन्मदाखलात नाव समाविष्ट करुण घेऊ शकतात .1969 पूर्वीच्या जन्म नोंदणी मध्ये सुद्धा नाव समाविष्ट करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे .
नाव कसे समाविष्ट करायचे ?
नाव समाविष्ट करण्यासाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंद झाली आहे त्या ठिकाणच्या कार्यालयात तुम्हाला जायचे आहे म्हणजे तुमचा किंवा बाळाचा जन्म ग्रामीण भागात झाला असेल ,तर ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालयात किंवा बाळाचा जन्म किंवा तुमचा जन्म शहरी भागात झाला असेल तर नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालय यांच्याकडे तुम्हाला जायचे आहे .जन्मदाखलात नाव समाविष्ट करायचे असेल तर अर्जदाराच्या नावाच्या खात्रीसाठी त्याचा शाळा सोडल्याचा दाखला ,दहावी-बारावीचे शैक्षणिक प्रमाणपत्र ,आधार कार्ड इ . कागदपत्रे लागणार आहेत . त्यानंतर नागरिकांना नावासहित जन्मदाखले दिले जातात . जन्मदाखलात नाव समाविष्ट करण्याची अंतिम मुदत 27 एप्रिल 2036 पर्यंत आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत जन्मदाखल्यामध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही ,असं महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे .
जन्म दाखला दुरुस्ती कशी करायची ?
जन्मदाखलात नावाची दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शपथ पत्र तयार करून घ्यायचे आहे . शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हे शपथ पत्र तयार करून घ्यायचे आहे. नावात बदल किंवा दुरुस्ती करण्या बाबत आशयाचे शपथ पत्र असेल . यात अर्जदाराची संपूर्ण माहिती त्यात जुने चुकलेले नाव, त्यामागचे कारण जसे की नजर चुकीने टाकण्यात आलेले पण खरं नाव अमुक आहे ,असे सविस्तर माहिती नमूद कराय ची आहे . सेतू कार्यालय मधून किंवा नोटीरीच्या वकीलांकडून तुम्ही शपथ पत्र तयार करून घेऊ शकता. या शपथ पत्र सोबत पालकांचा आधार कार्ड तसेच बाळाचं आधार कार्ड असेल तर तेही तुम्हाला जोडावे लागणार आहे .हे कागदपत्र एकदा का संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा केली की आठवड्या भराच्या आत तुम्हाला नावातील दुरुस्ती सहित जन्मदाखला मिळणे अपेक्षित असते .