चार महिन्यांमध्ये हळदीच्या किंमतीत 180 टक्क्यांनी वाढ, या कारणामुळे मिळतोय हळदीला चांगला भाव? वाचा सविस्तर…

देशात एका वस्तूचे भाव स्वस्त होतात , तर दुसऱ्या वस्तूचे भाव महाग होतात . टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव कमी झाले आहेत, तर आता हळदीला चांगला भाव मिळत आहे. घाऊक बाजारात हळदी चे भाव 18 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहचले आहेत .

मान्सूनचे आगमन होताच देशात तांदूळ, मैदा, डाळी, साखर, कांदा याच बरोबर बहुतांश खाद्य पदार्थांना सुद्धा चांगले भाव मिळू लागले आहेत .गेल्या चार महिन्यांत हळदीच्या दरात १८० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हळदीचा भाव . सध्या घाऊक बाजारात  18 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. वास्तविक, हळद हा अतिशय उपयुक्त मसाला आहे. याशिवाय आपण चवदार भाज्यांची कल्पना करू शकत नाही.

याचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि ताजे राहते. हळद हा एक मसाला आहे, जो गरीबातील सर्वात गरीब आणि श्रीमंतातील सर्वात श्रीमंत वापरतो. मात्र आता हळदीच्या दरात वाढ कशा मुळे होत आहे . त्याचे खरे कारण समोर आले आहे.

त्याचा थेट परिणाम हळदीच्या दरावर झाला आहे.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी 20 ते 30 टक्के कमी क्षेत्रात हळदीची पेरणी केल्याचे बोलले जात आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली असून, त्यामुळे भाव वाढले आहेत. याशिवाय अवकाळी पावसामुळे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रत हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम हळदीच्या दरावर झाला.

किंमती कमी होऊ शकतात. 

त्याच बरोबर एल निनोच्या प्रभावामुळे अनेक भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे भाव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हळदीचे उत्पादनही घटले आले.  त्याचबरोबर देशातून हळदीची निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली आहे. एप्रिल ते जून 2023 दरम्यान, देशातून हळदीची निर्यात 16.87 टक्क्यांनी वाढून एकूण 57,775.30 टन झाली. त्याचबरोबर दक्षिण भारतातील हळदीच्या उत्पादनात यावेळी 45 ते 50 टक्के कपात झाली आहे. भारत सुमारे 1.50 कोटी पोती हळद आयात करतो. मात्र यावर्षी आता पर्यंत देशात 55 ते 56 लाख पोती हळदीचे उत्पादन झाले आहे. मात्र, येणारा सणासुदीच्या काळात त्यात आणखी वाढ होणार असून त्या नंतर भावात घसरण होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *