Lal kanda Bajarbhav : लासलगावला लाल कांदा पोहोचला पाच हजारावर…

Lal kanda Bajarbhav : राज्यात गुरुवारी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी एकूण २ लाख २१ हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्यात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची तब्बल ८२ हजार ७५१ क्विंटल आवक झाली. तर पोळ म्हणजेच लेट खरीप कांद्याची १४ हजार ४१४ क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याची केवळ पावणे पाचशे क्विंटल आवक झाली.

सोलापूर जिल्ह्यात गुरूवारी ४२ हजार क्विंटल आवक झाली. किमान दर ५०० रुपये, जास्तीत जास्त दर ६ हजार रुपये तर सरासरी दर २७०० रुपये इतका मिळाला. मागच्या दोन आठवड्यात सोलापूर बाजारातील लाल कांद्याचे सरासरी दर २७०० ते ३ हजार रुपयांच्या आसपास स्थिर असल्याचे दिसून येते. सोलापूर खालोखाल अहिल्यानगरमध्ये कांदा आवक झाली. ३२ हजार ३७८ क्विंटल आवक एकट्या नगर जिल्ह्यात लाल कांदयाची झाली. त्यातून कमीत कमी १ हजार तर सरासरी ३३६६ रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले.

लासलगावला कांद्याचे ओलांडली पाच हजारी..

दरम्यान गुरुवारी १२ डिसेंबर रोजी कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात लाल कांद्याची सुमारे २१ हजार क्विंटल आवक झाली. किमान दर ११०० रुपये तर जास्तीत जास्त दर ५००१ रुपये असा होता. सरासरी ३६०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. मालेगावला मुंगसे बाजारात सुमारे १० हजार क्विंटल कांदा आवक होऊन सरासरी ३२०० रुपये, तर सिन्नर बाजारात ३३३५, कळवणला सरासरी ३ हजार, मनमाडला ३३०० रुपये असा लाला कांद्याला सरासरी दर मिळाला.

सद्या पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांदा मोठ्या प्रमाणात येत असून गुरुवारी सुमारे १३ हजार क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. बुधवारपेक्षा त्यात घट झाल्याचे दिसून आले. पोळ कांद्याला कमीत कमी दर १ हजार, जास्तीत जास्त दर ४६५१, तर सरासरी ३७०० रुपये दिसून आला. बुधवारच्या तुलनेत दरात किरकोळ घसरण झाल्याचे दिसून येत असले, तर एकूण आठवड्यातील आवकेच्या तुलनेत बाजारभाव टिकून असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 
 

Leave a Reply