भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी ही संगणक प्रणाली अद्यावत केली असून आता ई मोजणी 2.0 ही नवीन प्रणाली आणली आहे . यामध्ये जमीनधारक स्वतः मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. तसेच मोजणीची फी सुद्धा ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएस द्वारे कळणार आहे.
यासह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत सुद्धा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी नागरिकांना मोजणी कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच मोजणीच्या नकाशावर अक्षांश रेखांश (कोर्डिनेट्स )दिले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना जमिनीचे लोकेशन सुद्धा कळणार आहे.भुमी अभिलेख विभाग सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने सुविधा देण्यास प्राधान्य देत आहे. सातबारा संगणकीकरण , ई फेरफार, ई हक्क याद्वारे नागरिकांना घरबसल्या सुविधा देत आहे. ऑनलाइन सातबारा उतारा पाठोपाठ आता भूमी अभिलेख विभागाने मोजणीची प्रक्रिया सुद्धा सोपी आणि सुटसुटीत करण्याचे काम हाती घेतली आहे . त्याद्वारे नागरिकांना जमीन मोजणीचा नकाशा अर्थात क – प्रत सुद्धा ऑनलाईन देण्याचे काम हाती घेतले आहे.
राज्यात दरवर्षी काही हजार मोजणीचे अर्ज दाखल होतात. अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित अर्जदारांच्या जमिनीची मोजणी करताना त्या जागेचे अक्षांश रेखांश देखील निश्चित करण्यात येणार आहे. ते जमिनीच्या भू आधार क्रमांकशी जोडण्यात येणार आहे. तसेच या अक्षांश रेखांश याची माहिती ‘क्र प्रत’ वर देण्यात येणार आहे. जेणेकरून ‘क प्रत’ वरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर घरबसल्या संबंधित जमिनीचे लोकेशन पाहता येणार आहे . पहिल्या टप्प्यामध्ये सहा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करून त्या ठिकाणी ‘ई मोजणी व्हर्जन 2’ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याची निवड करून त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी सुरू आहे. अशी माहिती भूमीलेख विभागाकडून देण्यात आलेली आहे. मोजणी अर्ज दाखल झाल्यानंतर मोजणी करताना संबंधित जमिनीचे कोर्डिनेट्स निश्चित करावी अशा सूचना भूकर मापकांना भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आलेले आहेत . त्यामुळे जमीन खरेदी करताना दाखविली एक आणि दिली दुसरी असे प्रकार जे होतात. त्यांना आळा बसणार आहे.लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू करण्यात येणार आहे असे भूमिलेख विभागाकडून सांगण्यात आले .
ई मोजणीची वैशिष्ट्ये:-
◼️ ऑनलाइन जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार.
◼️ ऑनलाइन मोजणी फी भरण्याची सुविधा उपलब्ध.
◼️ अर्जाची सदस्य स्थिती एसएमएस ने करणार.
◼️ जमीन मोजणी प्रत ऑनलाईन मिळणार.
◼️ मोजणीच्या नकाशावर अक्षांश रेखांश असणार.