MLA Anil Babar : सरपंच ते आमदार, सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेचे जनक, खानापूर विटा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास..

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज (31 जानेवारी) रोजी निधन झाले.आमदार अनिल बाबर यांना न्यूमोनिया संसर्ग झाल्यामुळे काल (30 जानेवारी) सांगलीमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले .

 राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सरपंच ते आमदार असा आमदार अनिल बाबर यांचा जीवनप्रवास..

अनिल बाबर यांच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती तरीही त्यांनी सरपंच ते आमदार असा मोठा राजकीय प्रवास त्यांच्या जीवनामध्ये केला. ते प्रथम सांगली जिल्हा परिषदेवर 1972 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते . अनिल बाबर यांनी विविध समित्यांचे सभापतीपद सुद्धा भुषवले होते. तसेच त्यांनी 1990 मध्ये अपक्ष म्हणून आमदार निवडणूक लढवली. दुसऱ्यांदा ते 1999 मध्ये आमदार झाले. त्यांचे स्वर्गीय आर. आर. आबा यांच्याशी सुद्धा घनिष्ठ संबंध होते. अनिल बाबर यांना सांगली जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण असलेल्या टेंभू योजनेचे जनक म्हणून ओळखले जाते. तसेच ते मध्यवर्ती बँकेचे सलग 20 वर्ष जिल्हा संचालक होते. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी मागील दोन निवडणूका लढवल्या . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचे घनिष्ठ नाते होते .

काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना असा राजकीय प्रवास त्यांचा राहिला. अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे .एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातुन विटा आणि खानापूर मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे त्यांनी मंजूर केली होती. मुख्यमंत्र्यांनी बाबर यांना सेना आमदारांची कामे होत नाही, म्हणून झालेल्या तक्रारींची चौकशी अहवाल तयार करा अशी महत्वाची जबाबदारी सोपवली होती. मंत्रिपदासाठी नाही तर , टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी शिंदें सरकार सोबत जात असल्याचेही आमदार अनिल बाबर यांनी सांगितले होते.

अवघ्या दीड वर्षापूर्वी पत्नीचे निधन.. 

आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन अवघ्या दीड वर्षांपूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये झाले होते. पत्नी शोभाताई बाबर व आता आमदार अनिल बाबर असे दोघांचेही अवघ्या दीड वर्षामध्ये निधन झाल्याने बाबर कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांना न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना प्रथम विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले होते . त्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आमदार अनिल बाबर व शोभाताई बाबर यांना त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *