राज्यात काही ठिकाणी आज सरी पडल्या आहेत. तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला. हवामान विभागाने काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला तसेच या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकते, असाही अंदाज दिला
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर नगर जिल्ह्यात रविवारी आणि सोमवारीही काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज आहे . रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.
तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस हलक्यासरी पडतील. धुळे जिल्ह्यात शनिवार आणि सोमवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. नाशिक जिल्ह्यात शनिवारी रविवारी आणि सोमवारी तर पुणे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागात आज तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्यासरी पडू शकतात. जालना, धाराशिव ,अमरावती, बीड , बुलढाणा ,अकोला जिल्ह्यात आज काही भागात हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.












