
बळीराजाच्या कष्टातून महाराष्ट्रातील सुपीक मातीत उत्पादित झालेल्या महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी वाढली आहे ,संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष एकट्या महाराष्ट्रातून निर्यात झाली आहेत. तर जानेवारीपर्यंत संपूर्ण देशातून २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. द्राक्ष व डाळिंबाची निर्यात महाराष्ट्रातून वरच्या वर वाढत आहे.
डाळिंबाची निर्यात तर सोलापूर जिल्ह्यातूनच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त होते.महाराष्ट्रात द्राक्ष निर्यातीत सोलापूर जिल्हा राज्यात चौथ्या नंबर वर आहे.सांगली , नाशिक, नंतरच्या दोन-तीन जिल्ह्यांत सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे.
भारतातून तसेच महाराष्ट्रातून मागील वर्षीपेक्षा यावर्षी द्राक्ष निर्यात कमीच झाली आहे. भारतातून झालेल्या द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. परंतु , गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्रातून व भारतातून द्राक्ष निर्यातीत घट झाली आहे.
युरोपियन देशांमध्ये ज्या मार्गावरून दरवर्षी निर्यात होते तो मार्ग यावर्षी बंद होता. भारतातून दोन लाख ३९ हजार मेट्रिक टन जानेवारीपर्यंत , तर एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातून एक लाख ८१ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाल्याचे पणन कार्यालयाकडून माहिती मिळाली .
आकडेवारी मेट्रिक टनात व जानेवारी २४ पर्यंत..
‘अवकाळी’ने बसला मोठा फटका
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. निर्यातक्षम द्राक्षाला गुणवत्ता राहिली नाही. त्यामुळे व नेहमीचा निर्यातीचा मार्ग बंद असल्यामुळे दूर अंतरावरून जहाज गेले. नाताळ काळात द्राक्ष पोहोच झाले नाही त्यामुळे भाव ही मिळत नसल्याने निर्यात घटल्याचे सांगण्यात आले.