पाच रुपये अनुदानाप्रमाणे १७७ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्यशासनाच्या निर्णयानुसार दोन लाख ७२ हजार २९९ दुग्ध व्यवसाय विकासच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाप्रमाणे एकूण १७६ कोटी ९२ लाख ४८ हजार रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे,’’ राज्याचे दुग्ध व्यवसाय विकासाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी अशी माहिती दिली.

प्रशांत मोहोड म्हणाले, की दूध व्यवसाय संकटात आल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ५ जानेवारी रोजी राज्य शासन निर्णयानुसार राज्यातील खासगी दूध प्रकल्पांना व सहकारी संघाना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. या अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. राज्यातील खासगी आणि सहकारी अशा एकूण २७९ दूध प्रकल्पांकडून अनुदानाची रक्कम मागणी करण्यात आली होती . परंतु प्रत्यक्षामध्ये ऑनलाइन पद्धतीने २३५ दूध प्रकल्पांनी परिपूर्ण नोंदणी केली आहे त्यामुळे दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी सदर दूध प्रकल्प अंतर्गत पात्र ठरले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या गाईना टॅगिंग करण्यात आले होते . यानुसार पस्तीस कोटी ३८ लाख ४९ हजार ६१८ लिटर दूध पुरवठा केला आहे १० लाख १८ हजार ८५६ गाईंची संख्या आहे . अनुदान वेळेत उपलब्ध व्हावे म्हणून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व सहकार या विभागामार्फत संयुक्तरित्या सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्राप्त अर्जाची तपासणी केली आहे . जिल्हा नियोजन सहकारी आणि खासगी प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी युजर आयडी आणि लॉगिन आयडी उपलब्ध करून देण्यात आला . यासाठी दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी विशेष मार्गदर्शन केले . ते या कामाचा सतत आढावा घेत होते. त्यामुळेच या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली .
– प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्ध व्यवसाय विकास

खासगी व सहकारी दूध प्रकल्प……२३५
पात्र दूध उत्पादक शेतकरी……२ लाख ७२ हजार २९९
दूध पुरवठा…… ३५ कोटी ३८ लाख ४९ हजार ६१८ लिटर
टॅगिंग गाईंची संख्या……१० लाख १८ हजार ८५६
अनुदान रक्कम……१७६ कोटी ९२ लाख ४९ हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *