खत कंपन्यांकडून केला जाणारा खतांचा पुरवठा मागील वर्षीपासून भारत या नावाखाली होत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो या खतांच्या गोण्यावर आहे. कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा मतदानावर प्रभाव पडेल असा मजकूर असलेला खत तो फोटो स्टिकर चिकटवून विक्री करण्याचे बंधन निवडणूक आयोगाने दुकानदारांना घातल्याने आता खत विक्री कशी करायची ?
याची काळजी खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सह, खत विक्रेते यांना लागली आहे. असे स्टिकर खत विक्रेत्यांकडे उपलब्ध नाहीत आणि युरिया सारख्या खताला स्टिकर चिकटवणे परवडत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
खातांना आचारसंहित्येच्या कक्षेत आणायचे होते तर फोटो छापलाच कशाला ? असा प्रश्न खतविक्रेते करीत आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये हजारो टन खत गोदामामध्ये आहे आणि आता शेतकरी उसाला डोस देण्यासाठी खतांची मागणी करत आहेत परंतु खताची विक्री करता येत नाही.
यावर उपाय म्हणून आचारसंहितेच्या कक्षेतून खातांना काढावे अथवा स्टिकर लावण्याची व्यवस्था ज्या कंपन्यांचे खत आहे त्यांनी करावी अशी मागणी दुकानदार करीत आहेत. देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना केंद्र शासनाच्या खत विभागाने खत कंपन्यांना दिल्या होत्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या सोबत खतांच्या गोणीवर छापला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लोकसभेची आचार संहिता लागू झाल्यावर पत्र काढले व कोणत्याही मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असलेली खते किंवा तो मजकूर अथवा राजकीय व्यक्तीचे फोटो स्टिकरने झाकूनच विक्री करण्याचे आदेश खत विक्रेते व खत उत्पादकांना दिल्या आहे .
जर कोणत्या दुकानदाराने आदेशाचे पालन केले नाही किंवा कोणाची तक्रार आली तर अशा दुकांदारावर गुन्हे दाखल करण्यात येतील . हजारो टन खते खत विक्रेत्यांकडे गोदामामध्ये शिल्लक आहेत. तसेच शेतकरी खतांची मागणी उसाच्या डोससाठी करीत आहेत.
दुकानदाराकडे या खतांच्या गोणीवर असलेला फोटो झाकण्यासाठी स्टिकर उपलब्ध नाहीत. आणि बाजारातून विकत असे स्टिकर आणणे दुकानदाराला परवडत नाही. त्यामुळे दुकानदारांना अशी खते शेतकऱ्यांना विकायची कशी हा प्रश्न पडत आहे.
गोणीला रंगही लावता येईना…
खत विक्रेते दुकानदार पंतप्रधान मोदींच्या फोटोला रंग लवायलाही धजत नाहीत. रंग लावून फोटो झाकण्यात आला तर त्या ठिकाणी वेगळाच रंग येण्याची भीती खत विक्रेत्या मध्ये आहे . त्यामुळे ज्या कंपनीचे खत आहे त्या कंपनीने दुकानदारांना स्टिकर पुरवावेअशी दुकानदारांची मागणी आहे . ते स्टिकर लावून दुकानदार ते खते विकतील . लातूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी यावर निवडणूक आयोगाने पर्याय काढावा अशी विनंती देखील केली आहे.












