बिपरजॉय चक्रीवादळामुळे राजस्थानमधील नर्मदा कॅनॉल, धरण फुटले.

rajsdhan narmada dharan

बिपरजॉय चक्रीवादळामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जालोर जिल्ह्यातील सांचोर मधील धरण फुटल्याने अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.सांचोर मधील धरण फुटल्यामुळे नर्मदा उपसा कालव्यातही पाणी वाढले त्यामुळे तेही फुटले.

रात्री धरण फुटतात संपूर्ण शहर रिकामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसामुळे शहरांमध्ये नद्यांसारखे पाणी वाहत आहे. रविवारी सकाळी सिरोही, जालोर, बारमेर मध्ये पाऊस सुरूच आहे.आतापर्यंत या जिल्ह्यांतील काही भागामध्ये 10 ते 13 इंच (एक फूट) पाऊस झाला आहे.

बिपरजॉय वादळामुळे सांचोरसह परिसरात पाऊस सुरू आहे.यासोबतच येथे बांधण्यात आलेल्या सुरवा धरणातही गुजरातकडून सातत्याने पाणी येत होते. जास्त पाणी भरल्यामुळे हे धरण शनिवारी रात्री उशिरा फुटले.

शहरामध्ये अचानक पाणी आल्याची माहिती मिळताच रात्री उशिरापर्यंत लोकांनी बाजारपेठेतील दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली . तसेच काही भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुरवा येथून हाडेतर मार्गे पाणी जाजुसनला पोहोचले.  नर्मदा कालव्याच्या सांचोर लिफ्ट कॅनॉल मध्ये जास्त पाणी आल्याने तोही फुटला.

जालोरशिवाय सिरेही आणि बाडमेरमध्येही पुराचा धोका वाढत आहे. येथे अनेक भागात 4-5 फुटांपर्यंत पूर आला होता, त्यानंतर एनडीआरएफ-एसडीआरएफच्या मदतीने लोकांना वाचवावे लागले. 1998 मध्ये आलेल्या चक्रीवादळापेक्षाही हे वादळ अत्यंत भयंकर असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *