कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त ठरणारे नवीन कापूस वाण विकसित,वाचा सविस्तर ..

कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीसाठी उपयुक्त असलेले मेडिकेटेड म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरात येणारे कापसाचे नवीन वाण विकसित करण्यात नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अतिसघन पद्धतीने लागवड केल्यास या वाणापासुन हेक्टरी २० क्विंटल पर्यंत उत्पादक मिळू शकते.पिकाचा कालावधी १२० ते १४० दिवसाचा असणार आहे. 

दररोज वैशिष्ट्यपूर्ण अशा मेडिकेटेड कापसाचा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात वापर केला जातो . त्यामुळे मेडिकेटेड कापसाला चांगला भाव देखील मिळतो. सर्वात प्रथम शेतातून वेचून आणलेल्या कापसावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तो दवाखाने आणि मेडिकल्स वर वापण्यात येतो .नागपूरचे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने पांढरे शुभ्र असलेल्या या किमती कापसाची वाढती मागणी लक्षात घेऊन नवीन वाण विकसित केले आहे.

वैद्यकीय क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्याची निर्मिती करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कापसाच्या या वाणात मायक्रोनिअर 3.5 ते 4.5 इतके असते . विशेष म्हणजे या वाणाचा कलर ग्रेड 74 ते 75 इतका आहे.

त्यामुळे या वाणाचा कापूस अतिशय पांढरा शुभ्र दिसतो. त्याच्या धाग्याची लांबी देखील 23 आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वाणापासून मिळालेला कापसाची शोषण क्षमता इतर वाणाच्या तुलनेत 25 टक्के जास्त असते. वर्षभर मागणी असणाऱ्या या कापसाचे उत्पादन घेतल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येतील . नागपूर संशोधन संस्थेकडून कापसाच्या या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांनाही उपलब्ध केले जाणार आहेत.

Leave a Reply