राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपयांप्रमाणे एका वर्षात 18 हजार रुपये पाठवले जाणार आहेत.
मुखमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली आहे . ज्या महिलानी जुलै महिन्या अर्ज केले आहेत अश्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवले आहे. आता ऑगस्ट महिन्यात ज्या महिलानी अर्ज सादर केले आहेत त्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार 3 हजार रुपये?
लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूर जिल्ह्यात आयोजित केला आहे . हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज जमा केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे , अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा होणार आहे . ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज जमा केले आहेत.त्यांच्या अर्जांची तपासणी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील .अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
नागपूर येथे होणार दुसरा राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा..
नागपूर येथे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे . यापूर्वी पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात झाला होता.त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले होते.
सरकारने ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले होते त्यातील काही रक्कम बँकांनी कपात केली होती.. परंतु , राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत, असे आदेश बँकांना दिले होते.राज्य सरकारनं नारी शक्ती एप मधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करुन घेतले होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात राज्य सरकारकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.तसेच पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्या पुण्यात झाल्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे.