Ladki bahin yojana : अरे बापरे! 1-2 लाख नाही तर तब्बल 9 लाख लाडक्या बहिणी ठरल्या ‘अपात्र’; दरमहा मिळणार हफ्ता होणार बंद ..

Ladki Bahin Yojana । विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाडक्या पात्र-अपात्र बहिणीची पडताळणी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत हजारांमध्ये असणारी संख्या आता चक्क लाखांवर जाऊन पोहचली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद केलेल्या महिलांची संख्या तब्बल 9 लाखांवर गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.

‘नमो शेतकरी योजने’चा लाभ आणि ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना ‘लाडकी बहिण योजने’तील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळले जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आले आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवे निकष Ladki Bahin Yojana I

* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जातील. पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळवा यासाठी सरकारकडून आता कठोर पाऊले उचलली जाणार आहेत.
* लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करुन हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांचा या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे.
* लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही, हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.

काही अर्जाची होणार फेरतपासणी Ladki Bahin Yojana I

या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे. अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल, त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागली आहे.

Leave a Reply