सरकारचा मोठा निर्णय ! आता महाराष्ट्रातही पिकणार काळा तांदूळ, इतक्या टन पर्यंत निर्यात करण्यास मान्यता….

काळं मीठ तांदूळ हे एक पौष्टीक धान्य म्हणून ओळखले जाते .काळा तांदूळ हा अनेक आजारांसाठी  लाभदायी आहे.  त्यामुळे डॉक्टर याच्या सेवनाचा सल्ला देतात . दरम्यान सरकारकडून काळं मीठ तांदळा संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. काळ मीठ तांदूल हे भारतामध्ये हरियाणाच्या काही भागामध्ये तसेच उत्तर प्रदेशच्या अलिदाबाद येथे पिकवला जातो. साधारण पणे हा तांदूळ 4 ते 5 पट जास्त किंमतीने सफेद तांदळाच्या तुलनेत विकला जात असतो . आता सरकारच्या एका निर्णयामुळे हे पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

काळं मीठ तांदूळ निर्यात करण्यासाठी मान्यता ..

1,000 टन पर्यंत काळं मीठ तांदूळ निर्यात करण्यासाठी सरकारने नेमलेल्या सीमाशुल्क केंद्रांद्वारे मान्यता देण्यात आली आहे. गैर-बासमती तांदळाचा काळे मीठ हा एक प्रकार असून आता पर्यंत याची निर्यात प्रतिबंधित होती. त्यामुळे काळा तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळत नव्हता. परंतु यासंदर्भात नोटिफिकेशन सरकारने जाहीर केले आहे. परंतु या तांदळाची सरसकट निर्यात करता येणार नाही. सरकारचे नोटिफिकेशन लागू झाल्याच्या तारखेपासून काळ्या तांदळाच्या एकूण प्रमाणात फक्त 1,000 टनांच्या मर्यादेपर्यंतच निर्दिष्ट सीमाशुल्क स्थानकांद्वारे निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.

काळे मीठ तांदूळ आणि त्याचे प्रमाण प्रमाणीकरण विदेशी व्यापार संचालक व लखनौ कृषी विपणन हेकरणार आहेत. या प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीला सहा सीमाशुल्क स्थानकांद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू कस्टम हाउस, गुजरात कांडला येथील कस्टम हाऊस, वाराणसी एअर कार्गो, एलसीएस बर्हानी व नेपाळगंज रोड येथील लँड कस्टम स्टेशन या स्थानकांचा समावेश आहे.

या तांदळाच्या विशेष बाबी ..

अँटिऑक्सिडेंट गुणधर्म काळे मीठ तांदळात जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे या तांदळाचा उपयोग आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर लाभदायी असतो . या तांदळाचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते . काळ्या तांदळामध्ये तपकिरी व पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि जस्त जास्त प्रमाणात असते.

असे म्हणतात की, सहाशे वर्षापुर्वी आपल्या देशात काळे मीठ तांदूळ आढळले होते . द बुद्धा राइस किंवा भगवान बुद्धाचा महाप्रसाद असे या तांदळाला म्हटले जाते.. नेपाळचे व उत्तर प्रदेश येथील पारंपारिक शेतकरी या तांदळाचे पिक घेतात.

Leave a Reply