तुम्हाला जर जमीन मोजणी करून घ्यायची असेल तर आता जमीनमोजणी होणार आहे फक्त तीस मिनिटात, आता बांधावरून होणारी भांडणं म्हणजे शेती बांधावरून होणारी भाऊ बंदकी असते ते आता मिटणार असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त त्याचबरोबर अचूकता आणि वेळेची आणि इंधनाची बचत आणि मुख्य म्हणजे झाड आणि पिकांचा जो अडथळा होत होता या आधी तो आता न होता करता येणारी ही मोजणी फक्त आता तीस मिनिटात होणार आहे.
महाराष्ट्राची जी भुमिअभिलेख साईट आहे जो भूमि अभिलेख विभाग आहे त्याच्याकडून आता रोवर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची आता मोजणी केली जाते . आणि या मशीनद्वारे एक हेक्टर क्षेत्राची मोजणी ही केवळ आता तीस मिनिटात करणं शक्य होत आहे. असा दावा भूमिअभिलेख विभागाने सुद्धा केलेला आहे . पण हे मशीन नेमकं काय आहे ? ते कसं काम करते ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीनमोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशिन पद्धतीपेक्षा नेमके वेगळे कसे आहे आणि ते सगळं आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत, तर रोव्हर मशीन म्हणजे आता महाराष्ट्रात 77 ठिकाणी ‘कॉर्स’ (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) असे आता स्थापन करण्यात आलेले आहेत आणि हे रेफरन्स स्टेशनचा संपर्क हा थेट उपग्रहाशी आहे आणि रोव्हर हा एक मोविंग ऑब्जेक्ट देखील आहे जो आपण थेट शेतात घेऊन जाऊ शकतो . त्यासाठी हे एक अद्ययावत तंत्रज्ञान आहे याचे सुधा कनेक्शन सॅटॅलाइटशी आहे.
त्यामुळे कुठे सुद्धा गेला तर हे रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शवते आणि हे रोव्हर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी देखील जाऊ शकता . पूर्वी प्लेन टेबल किंवा ईटीएस मशीनच्या सहाय्याने ही जमीन मोजणी केली जायची जमीन मोजणी करताना फार वेळ लागायचा आता शेतकरी वहिवाटीच्या खुणा जसजशा दाखवेल तसंतसं त्याच्या सोबत जात त्याच्या सोबत चालत चालत आपल्याला रोव्हर त्या ठिकाणी रिडींग घेऊन देतो . हे एका मिनिटात शक्य होते . जो पर्यंत आपलं क्षेत्र फिरून होत तोपर्यंत त्या क्षेत्राची रोवर द्वारे मोजणी सुद्धा पूर्ण होते. ईटीएस मशीनला अर्धा दिवस किंवा दिवस दिवस लागायचा पण आता रोव्हर द्वारे एक हेक्टर क्षेत्रावरची मोजणी अगदी अर्ध्या तासात होते .
टेबल प्रक्रिया करताना आपल्याला प्रत्येक 200 मीटर वरती टेबल लावा लागायचे त्यानंतर उंच झाडांचे निरीक्षण घेता यायचं नाही किंवा मग त्यातही अडथळे यायचे झाडांच्या फांद्या तोडाव्या लागायचा उंच गवत असेल तर मग मोजणी होऊच शकायची नाही . ईटीएस मशिन जी आहे ईटीएस मशिन साडेचार फूट उंचीची लावावी लागायची आणि यापेक्षा जास्त उंचीची झाडं असली की मग मोजणी करताना अडथळा यायचा , पण आता या रोव्हर मध्ये रीडिंग सॅटेलाईट कडून येतं आणि त्यामुळे इथला परिसर आहे तो परिसर जर ओपन टो स्काय असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन देखील असून घेऊ शकता ही मोजणी अगदी तात्काळ होते. आपल्याला अगदी पाच सेंटीमीटर च्या अचूकतेची सुद्धा यामध्ये मोजणी करता येते प्लेन टेबल आणि ईटीएस पद्धतीनं जमीन मोजणीसाठी खर तर टेबल प्रत्येक ठिकाणी उचलून न्यावे लागायचे पण आता हा जो रोव्हर आहे तो रोव्हर आता थेट शेतात जातोय ईटीएस मशीन साठी सुद्धा झाडे किंवा उंच सखल भागात चा अडथळा
दरवेळी याचा यासाठी अर्धा अर्धा दिवस लागायचा पण आता रोवर द्वारे अगदी कमी वेळात जमीन मोजणी होते . एक किलो मीटर क्षेत्रफळ जर का असेल तर फक्त दोन तासात ही मोजणी होते ,रोव्हर मशीन ने जमीन मोजणी ची पद्धत किती अचूक आहे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल ? या रोव्हर मुळे जमीन मोजणी ची पद्धत आहे ती अचूक आहे आतापर्यंत सोलापूर ,पुना, सातारा आणि नांदेडमध्ये रोव्हर वापरून हजार पेक्षा जास्त प्रकरणांची मोजणी करण्यात आलेली आहे आणि ती अचूक देखील आहे ती पाच सेंटीमीटर च्या आता आहे. जर आपण सर्व साधारण विचार केला तर भूमी अभिलेखाचे मोजणी ची परमिसिबल लिमिट असते ती ग्रामीणभागासाठी 25 सेंटीमीटर आणि शहरी भागासाठी साडेबारा सेंटीमीटर असते त्याच्या आत मधली अचुकता आहे, ती अचूकता खरतर मिळत असल्यामुळे रोव्हर मुळे मोजणी कामामध्ये खूप गती आलेली आहे आणि ते खूप महत्त्वपूर्ण देखील झाल आहे.
कारण रोव्हर वापरून आता जी मोजणी केली जाणार आहे त्याचे अक्षांश रेखांश आहेत तर ते आपल्याला आता अचूक मिळणार आहे आणि ते कायमस्वरूपी जतन देखील केले जाणार आहेत. म्हणजे जर भूकंप झाला किंवा मग पूरपरिस्थिती आली किंवा मग दगड खुणा वाहून गेल्या तरी सुद्धा आपल्याला अक्षांश रेखांश असल्यामुळे तुमच्या पूर्वीच्या हद्दी तुम्हाला मिळू शकणार आहेत हे एक महत्त्वपूर्ण शोध म्हणता येईल , अतिक्रमण करताना लोक बांध कोरतात त्यामुळे जमिन समोरच्याची असल्याचा भास आपल्याला होतो पण यामध्ये अक्षांश-रेखांश असतात त्यामुळे बांध कोरनारे आता उघडे पडणार आहेत आणि या पद्धतीने जर का मोजणी करून घेतली तर समोरच्याने कितीही बांध कोरले ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल . आणि अतिक्रमणाला यामुळे मुख्यतः आळा बसेल. औरंगाबादच्या भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाचे एकमेव ही राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था आहे. आणि तिथून आतापर्यंत बऱ्याच जणांना या रोव्हर साठी चे ट्रेनिंग देखील देण्यात आले आहे. तेव्हा रोव्हर द्वारे होणारी जमिनीची मोजणी ही तंतोतंत आहे अचूक आहे पण समजा कोणी अतिक्रमण केल असेल तर सरकारी यंत्रणेकडे अर्ज करून त्याचे निराकरण तुम्हाला करता येऊ शकते . ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तेव्हा तुम्हाला जर जमीन मोजणी करायची असेल तर तुम्ही हा रोव्हर वापरून तुम्ही तुमची जमीन मोजणी करून घेऊ शकता आणि वेळेची बचत करू शकता तुम्ही यापद्धतीचा अवलंब करू शकता.