शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन;

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन;

बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25% अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे.  याबाबत तातडीने पिक विमा कंपनीने अग्रीम पिक विमा वाटप करण्याची निर्देश दिले आहेत.बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेचे प्रशासनाने तंतोतंत पालन केले आहे.  जिल्ह्यातील एकूण 87 मंडळामध्ये 25% खरीप पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत पिक विमा कंपनीने तातडीने अग्रीम पिक विमा वितरित करण्याचे निर्देशही दिले असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची अधिसूचना काढली असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात दुष्काळ दृश्य परिस्थिती.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसापूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळ सदस्य परिस्थितीचा आढावा घेतला होता . यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तंतोतंत पालन केले आहे. बीड जिल्ह्यामध्ये विशेष करून सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीमध्ये पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

बीड जिल्ह्यामधील अकरा तालुक्यांमध्ये पावसाने खंड दिल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून शेतकऱ्यांना ग्रीन पिक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसाच्या आत महसूल कृषी आणि पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करून अहवाल सादर करावा

सोयाबीन मूग आणि उडीद या तीन पिकांचा समावेश

बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी याबाबतची अधिसूचना निर्गमित केली आहे .पिक विमा कंपनी महसूल आणि कृषी यांनी निर्देशित केलेल्या सर्व 87 महसूल मंडळांमध्ये सोयाबीन मूग आणि उडीद या पिकांचे सर्वेक्षण करावे . तसेच या सर्व महसूल मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे नुकसान हे सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षा जास्त असल्यामुळे निरीक्षणानुसार ही सर्वच्या सर्व महसूल मंडळी पिक विमास पात्र आहेत या सर्व महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पिक विमा देण्यात यावा अशा पद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. 

एका महिन्याच्या आत मिळणार अग्रीम विमा

बीड जिल्हा प्रशासनाने संबंधित अधिसूचना जारी केल्या असून सदर सर्व 87 मंडळातील सोयाबीन ,मूग, उडीद या पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत 25 टक्के प्रमाणे अग्रीम पिकविमा मिळणार आहे. हे आता निश्चित झाले आहे. या कठीण काळात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मी व आपले सरकार आपल्या जिल्ह्यातील सर्व यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे.  अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *