पावसाबाबत आनंदाची बातमी: हवामान खात्याकडून मोठी अपडेट, पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार पाऊस बरसणार,

पावसाबाबत आनंदाची बातमी: हवामान खात्याकडून मोठी अपडेट, पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार पाऊस बरसणार,

गेल्या चार आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात हळूहळू सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे . विदर्भ मराठवाडा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून रिमझिम होत आहे. 

त्यातच आता हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.  पुढील चार ते पाच दिवस मान्सून साठी अत्यंत अनुकूल असतील . त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे . दुसरीकडे कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता असून प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये  शुक्रवार आणि शनिवार काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.  काही भागांमध्ये ढगांच्या गडगडासह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दरम्यान उद्या महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात ही मध्य महाराष्ट्र मध्ये नाशिकचा काही भाग,  अहमदनगर काही भाग , पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 सप्टेंबरला अधिक पाऊस होण्याची शक्‍यताआहे.  सोलापूर, सातारा, सांगली ,पुणे ,धाराशिव तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली येथे पण गडगडासह पावसाची शक्यता आहे.

एक तारखेला शुक्रवारी दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र शनिवार आणि रविवार दक्षिण मराठवाडा भागात धाराशिव, लातूर, नांदेड ,हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस राहील

अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. याशिवाय पुणे,  मुंबई मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे . पश्चिम महाराष्ट्र मध्ये 2 सप्टेंबरला अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता.  त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिना हा कोरडा गेला परिणामी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पीक करपण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात व पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे . याशिवाय उकाड्याने हैराण झालेले शहरी भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल.

Leave a Reply