सर्वच डाळीचे भाव कडाडले ,तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो,

तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो, सर्वच डाळीचे भाव कडाडले

आज किरकोळ बाजार मध्ये तुरीचा भाव 175 रुपये किलो आहे . दोन महिन्यापूर्वी शंभर रुपयांवर असलेली तूर डाळ आता 160 ते 175 रुपये किलो झाली आहे.गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊस मान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालावर झाला आहे . यामुळे खाद्य वस्तूंच्या किमती वाढताना दिसत आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक ही खूप कमी आल्यामुळे मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहेत.  बारा हजार रुपये क्विंटल ने आज तुरीची बाजारात खरेदी झाली आहे.  त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून बाजारात ज्या वेळेस तुरडाळ येते त्याच वेळेस भाव वाढताना दिसत आहेत.

आज किरकोळ बाजार मध्ये तुरीचा भाव हा 175 रुपये किलो आहे.  दोन महिन्यापूर्वी हा भाव शंभर रुपयांवर होता.  हरभरा डाळ, उडीद डाळ ,मसूर डाळ आणि मूग डाळीच्या दारातही दोन महिन्यात सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून डाळीच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कमी उत्पादन झाल्यामुळे बाजारातील कडधान्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे . तूर डाळ दोन महिन्यात शंभर ते 110 रुपयांवरून 160 ते 170 रुपये झाली तर हरभरा डाळ ही 57 ते 58 रुपयांवरून 70 रुपये प्रति किलो वर गेले आहेत . उडीद डाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रति किलो झाली असून मसूर डाळीतही किलोमागे दहा ते बारा रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून मूग डाळ ही 80 ते 85 रुपयांवरून 110 रुपयांवर आहे. 

देशभरात खरीप हंगामात कडधान्याचे लागवडीत घट झाली असून जून अखेरीस पेरणी योग्य पाऊस झाला तरच कडधान्याची लागवड होते . यंदा जुलै अखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्याचा पेरा घटला असून गेल्या 25 ऑगस्ट अखेर 128.07 लाख हेक्टर वर कडधान्याची लागवड झाली होती.  परंतु यंदा ती लागवड 117 . 44 लाख हेक्टर घसरली आहे. 

तुरीची लागवड 42.11 लाख हेक्टर उडीद 31.10 अन्य कडधान्याची 13.34 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.  लागवडीत घट झाल्यामुळे पुढील वर्षभर डाळींचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बाजारात भाव मात्र शेतकऱ्यांकडे माल नाही.. 

बाजारामध्ये सध्या तूर आणि हरभऱ्याची आवक खूप कमी आहे.  सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली होती, बाजारामध्ये हरभऱ्याला भाव नव्हता तेव्हा हमीभाव केंद्रावर उत्तम भाव होता या कारणामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणारा हरभरा हमीभाव केंद्राला विकला.  भारतात एकूण 95 लाख मॅट्रिक टन हरभऱ्याची उत्पादन झाले होते . त्यापैकी 30 लाख मॅट्रिक टन हरभऱ्याची खरेदी सरकारने केली आहे.  आणि हरभऱ्याला आता बाजारभाव उत्तम असला तरी शेतकऱ्यांकडे माल कमी आहे. 

भाव कमी होण्याची चिन्ह नाहीत.. 

गेल्या वर्षी कमी झालेली डाळीची लागवड अनियमित पाऊसमान याचा डाळींच्या उत्पादनावर परिणाम झाला असून यावर्षी महाराष्ट्र सह इतर राज्यातही पावसाने दिलेली ओढ याचा थेट परिणाम शेतमाल उत्पादनावर झाला आहे.  त्यामुळे संपूर्ण देशांमध्येच डाळीचे उत्पादन यावर्षी कमी प्रमाणात आहेत.  याचा थेट परिणाम बाजारातील भाव वाढीवर झाला असून पाऊस पडेल आणि उत्पादन चांगले येईल अशी स्थिती आता राहिली नाही.  पावसाने दिलेल्या ओढीमुळे उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला असून पुढील हंगामातच उत्पादनाची शक्यता असल्याने सर्व प्रकारच्या डाळींचे भाव वाढ झाल्याचे बोलले जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *