युनिक आयडेटिफिकेशन ऑथोरिटी देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते. तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि तुम्ही कुठे राहता याचा पुरावा यासारखी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
तुम्ही त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत मोफत ऑनलाइन अपलोड करू शकता.आधी यासाठी १४ जूनपर्यंत कालावधी दिला होता, ज्याला पुढे आणखीन मुदत दिली आहे. परंतु त्याऐवजी तुम्ही सामान्यतः हीच कागदपत्रे थेट कार्यालयात दिल्यास, तुम्हाला रु.२५ फी भरावी लागेल.
स्टेटस ऑनलाइन कसे पाहावे?
■ चेंज रिक्वेस्ट नंबर (URN) हा एका विशेष कोडसारखा असतो जो तुम्ही तुमचे ओळखपत्र किंवा पत्ता बदलण्यास सांगता तेव्हा तुमच्या फोनवर पाठवला जातो. वेबसाइटवर तुमच्या विनंतीची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही हा कोड आणि तुमचा आधार क्रमांक वापरू शकता. हा आधार नंबर आणि यूआरएन नंबर याच्या आधारे तुमच्या विनंतीची स्थिती पुढील पोर्टलवर पाहता येते.
ssup.uidai.gov.in/checkSSUPStatus/checkupdatestatus
कागदपत्रे ऑनलाइन अपलोड कशी करावी?
■ सर्व प्रथम, UIDAI Uidai.gov.in च्या वेबसाईटवर लॉग इन करा.
■ आधार नंबर टाकताच रजिस्टर मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल .
■ तुमचा दिसणारा फोटो आणि पत्ता तपासून पाहा.
■ तुमचा तपशील बरोबर असेल तर, ‘मी पडताळणी करीत आहे की वरील माहिती बरोबर आहे’, या टॅबवर क्लिक करावे.
■ दिसणारा तपशील चुकिचा असेल तर डाऊन मेन्यूमधून अपलोड करावयाच्या कागदपत्रांवर क्लिक करा.
■ ओळखपत्र कागदपत्र अपलोड करा. [फाइल साइज २ एमबीपेक्षा मोठी असू नये.फाइल पीएनजी किंवा पीडीएफ , जेपीईजी,फॉरमॅटमधील असावी.)
■ पत्त्यासंबंधी कागदपत्रे अपलोड करा. फाइल साइज २ एमबीपेक्षा मोठी असू नये. फाइल पीएनजी किंवा पीडीएफ , जेपीईजी,फॉरमॅटमधील असावी.)
■ तुमची याला संमती असल्याचे सबमिट करावे.
अपडेट केल्याचे काय फायदे?
■ अनेक सोयी सुविधा तुम्हाला ओळखपत्र आणि निवासाचा पत्ता याबाबत माहिती अपडेट केल्याने मिळू शकतात.
■ आपल्यापर्यंत अचूकपणे अनेक सेवा योजनांचे लाभ पोहोचवण्यात मदत होते.
■ ही माहिती अचूक असल्यास तुम्हाला १७०० हुन अधिक सरकारी तसेच बिगरसरकारी योजनांचे लाभ मिळू शकतात.
बदल कुणी, कधी करावा?
१. लग्न झाल्यानंतर नाव आणि पत्ता यामध्ये होणारे बदल याविषयी माहिती नोंदविण्यासाठी बदल करून घ्यावा.
२. काही कारणाने नव्या ठिकाणी राहण्यास गेले वा नवे घर खरेदी केले असल्यास बदल करावा.
३. मोबाइल नंबर, किंवा इ-मेल आयडी आदी बदललेला असल्यास नोंदवण्यासाठी बदल करावा.