kanda bajarbhav : आवक घटूनही कांद्याचे बाजारभाव पडले; कुछ तो गडबड है दया..

kanda bajarbhav : कांद्याची आवक घटूनही कांद्याचे बाजारभाव तब्बल १५०० ते १८०० रुपयांनी पडले आहेत. याचे कारण निर्यात घसरल्याचे दिले जात असले, तरी प्रत्यक्षात वेगळ्याच काही गोष्टी असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

दिल्ली राज्याची निवडणूक जवळ असून दिल्लीकरांना स्वस्तात कांदा मिळावा आणि परिणामी त्यांची मते आपऐवजी आपल्या पक्षाला मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षातील काही दिग्गज नेत्यांनी कांदा व्यापारी आणि निर्यातदारांना ईडी, आयकर आणि सीबीआयची कारवाई करण्यासाठी धमकावण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे कांद्याचे बाजारभाव दबावात आले असून ते पडले आहेत. मात्र अजून तरी या चर्चेल अधिकृत पुष्टी मिळाली नसून व्यापारी याबद्दल बोलायला तयार नाहीत. केवळ निर्यात, बांग्लादेश अशीच कारणे त्यांच्याकडून दिली जात आहेत.

१५ डिसेंबरपर्यंत कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. ३४०० प्रती क्विंटल होत्या. मात्र सोमवारी त्या २२०० रुपये आणि मंगळवारी २ हजार रुपयांपर्यंत खाली आल्यात. दरम्यान मागील आठवड्यात किंमतींत ७ टक्केनी घट झाली, तर या आठवड्यात दोनच दिवसात किंमती तब्बल ४० ते ४५ टकक्यांनी कमी झाल्या आहेत.

दरम्यान कृषी विभागाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम कक्षाने दिलेल्या माहितीनुसार देशपातळीवरव राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत १२ % नी घट झाली आहे. – मागील आठवड्यात पुणे बाजारात कांद्याच्या किंमती (रु. ४४५०/क़्वि.) सर्वाधिक होत्या, तर सोलापूर बाजारात कांद्याच्या रु.२८५०/क़्चि. होत्या. असे असूनही किंमती स्थिर राहण्याऐवजी कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *