हिरवा भाजीपाला खाणे सर्वांनाच आवडते यासाठी काही लोक खूप खर्च करतात तरी पण लोकांना विषमुक्त भाजीपाला खाण्यासाठी मिळत नाही कारण बहुतेक शेतकरी जास्त उत्पन्नासाठी रासायनिक खतांचा वापर करत असतात शेणखत ऐवजी शेतात रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर जास्त करतात यामुळे हिरव्या भाजीपाल्याची टेस्ट वर सुद्धा परिणाम होतो
परंतु देशात काही शेतकरी असे आहेत की जे सेंद्रिय शेती करतात व त्यांच्याकडून उगवण्यात आलेली भाजीची चव अधिक चांगली असल्यामुळे बाजारात लवकरात लवकर संपते आता आपण बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एक शेतकरी ची माहिती घेऊया कारण की यांनी सेंद्रिय शेती करून एक आदर्श निर्माण केला आहे
उन्हाचा उत्पादनावर परिणाम
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव मोहम्मद वसीम आहे हे दरभंगा जिल्ह्यामधील सिमइसीपूर गावातील आहेत ते सेंद्रिय शेती पद्धतीने भाजीपाला पिकवतात व तो बाजारात विकतात याच्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते परंतु उन्हामुळे भाजीपाल्यावर वाईट परिणाम होतो आणि उत्पादनावर देखील फरक पडतो
सिंचन व्यवस्था केली
पाण्याचा स्तर खाली गेल्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्यासाठी मेहनत त्यांना घ्यावी लागली पाणी नसल्यामुळे भाजीपाला पिके वाळत चालले होते यासाठी त्यांनी सिंचन व्यवस्था केली मोहम्मद वसीम यांच्या शेतामध्ये सध्या कारल्याचे पीक लावलेले आहे यासोबतच ते अनेक हिरव्या भाज्यांचे पीक घेत असतात यासाठी ते पूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर करतात यामुळे ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला ते ग्राहकांना देऊ शकतात सेंद्रिय शेतीतील माल असल्यामुळे ग्राहक या भाजीपाल्यावर तुटून पडतात व बाजारात त्यांचा भाजीपाला हातोहात विकला जातो