नाशिक मध्ये कोथिंबीर सोबतच मेथी, शेपू ,पालक, या पालेभाज्यांचे दर देखील जवळपास 50% नी वाढले आहेत.
पावसाचे आणखीन आगमन झालेले नाही. यामुळे नाशिकमध्ये धरणाने तळ गाठला आहे .तर दुसरीकडे पाले भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागच्या महिन्यामध्ये कोथिंबीरीच्या जुडीला चार ते पाच रुपये दर होता. तर त्याच कोथिंबीरला आज 100 ते 110 रुपये भाव आलेला आहे .तसेच कोथिंबिरी सोबतच मेथी, शेपू ,पालक या भाजीपाल्यांचे दर देखील जवळपास 50 टक्क्यांनी वाढले आहेत.
रोजच्या जगण्यासाठी लागणारा भाजीपाला दरात मागील दिवसात कमलीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आंदोलने केली होती. परंतु आता मात्र भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. भाजीपाल्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .
मागील आठवड्यात कोथिंबीर जोडीला 47 ते 50 रुपयाचा दर होता .तर शेपू मेथी 35 रुपये जुडीला दर होता .मात्र यात वाढ होऊन आज 100 ते 110 रुपयांचा भाव आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असते .नाशिकचे कृषी उत्पन्न समितीत मुख्यत्वे पालेभाज्या आणि कोथिंबीर सोबत अन्य काही भाज्यांची आवक घटून दर कमालीचे वाढले आहेत.
अवक घटली दर वाढले
नाशिक मध्ये सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जाते व इथूनच अनेक जिल्ह्यांना भाजीपाला पुरवठा केला जातो. बाजार समितीमधून 150 ते 200 वाहनांमधून भाजीपाला मुंबई व उपनगरामध्ये पाठविला जातो. पावसाला विलंब झाल्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे भाजीपाल्यांची आवक घटली .त्यामुळे दर वाढले असून नाशिक घाऊक बाजारात कोथिंबिरला प्रती 100 जुड्या सरासरी 4700 रुपये, तर मेथी 3300 व शेपू आणि कांद्याची पात प्रत्येकी तीन हजार पाचशे रुपये दर मिळत आहे.
असा आहे आजचा दर
बाजार समितीत एका दिवसात कोथिंबीर 7000 जुड्या मेथी 6000 जुड्या तर शेपू सहा हजार आठशे जोड्या कांदा पाच हजार जुड्या अशी आवक होत आहे यात कमी अधिक फरक दररोज होत असतो मागील आठवड्यात घाऊक बाजारात कोथिंबीरीला प्रतिजुडी 47 ,मेथी 33,शेपू पस्तीस आणि कांदा पात 35 रुपये जोडी होती. आज कोथिंबीरला १०० ते ११० रुपयांचा भावाला आहे. दरम्यान पाऊस लांबण्याने आवक जवळपास 60 ते 70 टक्के कमी झाली असून जवळपास महिनाभर ही परिस्थिती कायम राहील असा अंदाज वर्तवलेला आ