फेब्रुवारी महिन्यात पिकवा या पाच भाज्या, कमी खर्चात होईल जास्त कमाई ..

फेब्रुवारी महिन्यात शेतकरी आपल्या शेतात दोडका , मिरची, कारले, दुधीभोपळा,भेंडी या भाज्यांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. वास्तविक, फेब्रुवारी महिन्यात पिकवल्या जाणाऱ्या या पाच भाज्या कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देतात .याची संपूर्ण माहिती या लेखामधून जाणून घेऊया ..

देशातील शेतकरी हंगाम आणि महिन्यानुसार त्यांच्या शेतात वेगवेगळी पिके घेतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीतून वेळेत चांगले उत्पन्न मिळू शकेल.याच अनुषंगाने आज आम्ही फेब्रुवारी महिन्यात पिकवल्या जाणाऱ्या पाच भाज्यांची माहिती घेऊन आलो आहोत,या फळ भाज्यांची लागवड शेतकरी फेब्रुवारी महिन्यात करून चांगला नफा मिळवू शकतात. खरं तर, आपण ज्या भाज्यांबद्दल बोलणार आहोत त्या भाज्या आहेत दोडका , मिरची, कारले, दुधीभोपळा ,आणि भेंडी .

या प्रमुख पाच भाज्यांना बाजारात खूप मागणी आहे. त्याची लागवड करताना शेतकऱ्यांना फार कष्ट करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत
फेब्रुवारी महिन्यात पिकवणाऱ्या प्रमुख पाच भाज्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

फेब्रुवारी महिन्यात या प्रमुख पाच भाज्या पिकवा :-

1. दोडका (Ridge Gourd):- शेतकरी दोडकाची लागवड जवळजवळ सर्व प्रकारच्या जमिनीत करू शकतात . दोडकाच्या शेतीला उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते. बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या दोडकाची लागवड सुरू करण्यासाठी सर्वोत्तम महिना फेब्रुवारी आहे. याशिवाय दोडक्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यामुळे मागणी जास्त असते .

2. कारले (bitter Gourd) :- कारल्याची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत शेतकरी करू शकतात.परंतु कारली पिकापासून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि जिवाणू असलेली चिकणमाती हवी . हि माती कारले पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी योग्य मानली जाते.

3. मिरची (chilli): मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी पीक म्हणून करता येते. त्यांच्या शेतात मिरचीचे पीक शेतकरी कधीही लावू शकतात. खरीप हंगामासाठी मे ते जून तर रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर पेरणीचे महिने असतात . जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने उन्हाळी पीक म्हणून मिरचीची लागवड करण्यास उत्तम मानले जातात.

4. दुधीभोपळा(Bottle Gourd):- देशातील शेतकरी डोंगराळ भागापासून ते सपाट भागात सहजपणे दुधीभोपळाची लागवड करू शकतात. दुधीभोपळाच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान आवश्यक असते. शेतात बिया लावण्या पूर्वी २४ तास दुधीभोपळाच्या बिया पाण्यात भिजत ठेवा. हे बियाणे उगवण प्रक्रियेला गती देते.

5. भेंडी(Lady Finger):-भेंडी भारतीय बाजारपेठेत लोक सर्वाधिक विकत घेतात. देशाच्या बहुतेक भागात लागवड केली जाणारी ही एक भाजी आहे. भेंडी लागवडीचे तीन मुख्य हंगाम फेब्रुवारी-एप्रिल, जून-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर आहेत. या काळात शेतकरी भेंडीची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *